बेंगळुरूमध्ये एका हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. 39 वर्षीय विजय कुमार नावाच्या तरुणाची त्याचा बालमित्र धनंजय उर्फ जय याने हत्या केल्याचं समोर आलं आहे. ही हत्या अवैध प्रेमसंबंधांतून झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

विजय आणि धनंजय गेल्या 30 वर्षांपासून जवळचे मित्र होते. दोघेही एकत्र मोठे झाले होते. विजय रिअल इस्टेट आणि फायनान्स व्यवसायात होता. विजयचा जवळपास 10 वर्षांपूर्वी अशा नावाच्या महिलेशी विवाह झाला होता. आशा आणि विजयला दोन मुले देखील आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, विजयला अलीकडेच त्याची पत्नी आशा आणि बालमित्र धनंजय यांच्यातील अवैध संबंधांचा पता लागला होता. त्याने दोघांना रंगेहाथ देखील पकडले होते. यानंतर विजयने आपल्या पत्नीला धनंजयपासून दूर ठेवण्यासाठी दुसरीकडे राहायला गेला होता. मात्र, आशा आणि धनंजय यांचे संबंध सुरूच राहिले. वारंवारच्या भांडणांनंतर आशा आणि धनंजय यांनी विजयचा काटा काढण्याचा कट रचला.
घडलेल्या घटनेच्या दिवशी विजय संध्याकाळी घराबाहेर पडला, काही वेळानंतर विजय मृतावस्थेत आढळला. या घटनेत पोलिसांनी आशाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे, तर धनंजय फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार, ही हत्या अवैध संबंधांमुळे झाल्याचे दिसते. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू केला आहे.






