पुणे: शालेय शिक्षण विभागाकडून सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून संपूर्ण राज्यातील सर्व मान्यता प्राप्त उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावी प्रवेश ऑनलाईन पध्दतीने व गुणवत्तेनुसार करण्यात येणार आहेत. प्रवेशासाठीची कार्यपध्दती ठरविण्यात आली असून सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. गुरुवार (दि.८) पासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
राज्यातील सर्व क्षेत्राकरीता उच्च माध्यमिक कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या उच्च माध्यमिक शाळा, स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय यांचेशी संलग्न सर्व शाखांमधील इयत्ता ११ वीच्या प्रवेशाकरीता या शासन निर्णयातील तरतुदी लागू राहतील. राज्यातील अल्पसंख्यांक दर्जासह अन्य सर्व उच्च माध्यमिक कला, वाणिज्य व विज्ञान या शाखांमधील इयत्ता ११ वीच्या प्रवेशाकरीता या शासन निर्णयातील तरतूदी लागु राहतील. राज्यातील राज्य मंडळ संलग्नित उच्च माध्यमिक कला, वाणिज्य व विज्ञान या शाखांचे इयत्ता ११ वी चे प्रवेश केंद्रीय पध्दतीने व ऑनलाईन प्रणालीद्वारा होतील. एसएसव्हीसी व्यवसायिकचे प्रवेश ऑफलाईन पध्दतीने होणार आहेत.
शाळा, महाविद्यालयांची माहिती संकेतस्थळावर भरणे व अद्यावत करण्यासाठी ८ ते १५ मे अशी मुदत देण्यात आलेली आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी उच्च माध्यमिकच्या शाखांची माहिती प्रमाणित करण्यासाठी ८ ते १६ मे असा कालावधी देण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रोफाईल तयार करण्यासाठी १९ ते २८ मे हा कालावधी देण्यात आलेला आहे.
विद्याथ्यर्थ्यांना १९ ते २८ मे या कालावधीत कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम भरता येणार आहेत. प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यापुर्वी शुन्य फेरी व्यवस्थापन कोटा, अल्पसंख्यांक व इनहाऊस कोट्यातील प्रवेश निश्चित करता येणार आहे.
प्रवेश फेरींचे वेळापत्रक टप्प्या टप्प्याने जाहीर होणार आहे. सर्व प्रवेश फेरींची प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर अकरावीचे वर्ग ११ ऑगस्ट पासून सुरु करण्यात येणार आहे. संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ही शेवटचा विद्यार्थी प्रविष्ट होईपर्यंत गुणवत्तेनुसार ऑनलाईन पध्दतीने करण्यात यावी. ऑनलाईन प्रणाली व्यतिरिक्त अन्य प्रणालीमधून एकही प्रवेश शाळा व्यवस्थापनास करता येणार नाहीत. राज्यस्तर समितीने संपूर्ण प्रवेश प्रक्रियेची माहिती पुस्तिका, आरक्षण, प्रवेश प्रक्रि प्रक्रिया, टप्पे, वेळापत्रक या अनुषंगिक माहिती प्रकाशित करावी, अशा सूचना शिक्षण विभागाकडून करण्यात आल्या आहेत.