Wednesday, October 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिक्षण क्षेत्रातील सिंघम किसन भुजबळ यांना थेट ‘ ED ‘ (ईडी) ची नोटीस, बोगस शिक्षण भरती प्रकरणात चौकशीसाठी बोलवले ; तर उरुळी कांचन येथील एक शाळा अडचणीत?… 

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 28 July 2022, 10:01

पुणे : उरुळी कांचन, आकुर्डीसह जिल्हातील विविध शिक्षण संस्थामधील बोगस शिक्षक भरतीचा पर्दाफाश करणारे पुणे जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी किसन भुजबळ यांना चोकशीसाठी ईडी अर्थात प्रवर्तण निर्देशालय बोलवले आहे. येत्या 2 ऑगष्ट रोजी ईडीच्या कार्यालयात भुजबळ यांना हजर रहावे लागणार असुन, या चौकशीतुन जिल्हातील शिक्षण सम्रांटाचा बोगस शिक्षक भरती घोटाळा ईडीच्या रडारवर येण्याची शक्यता आहे.

राज्यातील राष्ट्रवादी कॉग्रेस, शिवसेनेसह, राज्यातील अनेक पक्षांच्या वरीष्ठ नेत्याना धडकी भरवणारी ईडी थेट पुणे जिल्हाच्या शिक्षण क्षेत्रात डोकावल्याने, जिल्हाच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. जिल्हा परीषदेचे शिक्षण विस्तारअधिकारी किसन भुजबळ यांनी उरुळी कांचन, आकुर्डीसह जिल्ह्याच्या विविध शिक्षण संस्थामधील बोगस शिक्षक भरतीचे रॅकेट उघडकीस आनले होते. यात वरीष्ठ अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा मलिदा लाटलेला आहे. हाच मलिदा बाहेर काढण्यासाठी ईडीच्या माध्यमातुन किसन भुज ‘बळ’ यांना आनखी बळ मिळण्याची शक्यता आहे.

जिल्हा परीषदेचे पुणे जिल्ह्यातील एका शिक्षणसंस्थेतील शिक्षक भरतीचा मोठा घोटाळा पुणे जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी किसन भुजबळ यांना बाहेर काढला होता. या प्रकरणाची दखल घेत ‘ईडी’ने भुजबळ यांना चौकशीसाठी येत्या दोन ऑगस्टला बोलाविले आहे.

दरम्यान, तीन वर्षापुर्वी उरुळी कांचन व आकुर्डी येथील एका शिक्षण संस्थेत काही वर्षांपूर्वी बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षक भरती करण्यात आली होती. काही शिक्षणाधिकाऱ्यांच्या संगनमताने ही भरती झाल्याचे चौकशीत उघडकीस आले होते. त्यात २३ शिक्षकांची भरती बोगस झाल्याचे आढळले होते.

 

या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात जिल्हा शिक्षण विस्तार अधिकारी किसन भुजबळ यांनी १९ ऑक्टोबर २०१९ रोजी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्यात पुणे जिल्हा परिषदेचे माजी शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख, दत्तात्रय शेंडकर; तसेच पुणे महापालिकेच्या माजी शिक्षणाधिकारी रामचंद्र जाधव, प्रशासकीय अधिकारी मीनाक्षी राऊत, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

या शिक्षण संस्थेने उरुळी कांचन येथील त्यांच्या संस्थेत काही शिक्षकांची बोगस भरती केल्याचे दाखविले. त्या आधारावर राज्य सरकारकडून पगार काढून घेतले. त्यानंतर काही वर्षांनी त्याच शिक्षकांना पुन्हा आकुर्डी येथील संस्थेत समाविष्ट करून घेतले. त्यावरून बोगस शिक्षक भरती झाल्याचा प्रकार जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी किसन भुजबळ यांनी उघडकीस आणला.

भुजबळ यांच्या तक्रारीनुसार २८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये काहींनी अंतरिम अटकपूर्व जामीन मिळविला; तर काहींना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीत काही ठिकाणी पोलिसांनी काही कागदपत्रे; तसेच बनावट शिक्के जप्त केले. त्यामध्ये शिक्षकांच्या नियुक्तीच्या मान्यतेबाबतचे लेटरपॅड; तसेच नियुक्तीची पत्रे आढळली आहेत.

भुजबळ यांनी हे प्रकरण उघडकीस आणल्याने ‘ईडी’ने त्यांना चौकशीची नोटीस पाठविली. येत्या २ ऑगस्ट रोजी त्यांना चौकशीसाठी बोलाविले आहे. यामध्ये भरती प्रकरणातील आणखी संशयितांची माहिती विचारली जाण्याची शक्यता आहे. किती शिक्षकांची भरती झाली, त्यातून किती प्रमाणात मनी लाँडरिंग झाले किंवा कसे याबाबत विचारणा केली जाणार आहे, असे ‘ईडी’ने पाठविलेल्या नोटिशीत म्हटले आहे. त्यामुळे या चौकशीनंतर राजकीय नेत्यांपाठोपाठ शिक्षणसंस्थाही ‘ईडी’च्या रडारवर येणार असल्याचे स्पष्ट चित्र आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणाचा निकाल राखीव; फाशीच्या शिक्षेवर न्यायालयाचा अंतिम निर्णय लवकरच…

Wednesday, 7 October 2026, 19:58

राहुल, प्रियांका गांधींना पुन्हा व्हॅनमध्ये कोंबलं! दिल्लीत हाय-व्होल्टेज ड्रामा; बसची हवा काढली अन् राहुल गांधी, प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात

Wednesday, 7 October 2026, 19:25

चक्क पोलीस करताय पाण्याचं रक्षण! महाराष्ट्रात दुष्काळामुळे भीषण हाल; धरणावर पोलिसांचा बंदोबस्त

Wednesday, 7 October 2026, 19:13

बारामतीत पारधी दाम्पत्याला जातीवाचक शिवीगाळ! शेतात मेंढ्या चारण्यावरून वाद; दोघांवर ॲट्रॉसिटीसह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल

Wednesday, 7 October 2026, 19:08

भाजपला मोठा धक्का! राज्यसभेची उमेदवारी हुकताच माजी खासदार धर्मेंद्र कश्यप नाराज; पक्ष सोडण्याचे संकेत

Wednesday, 7 October 2026, 19:04

‘दारूसाठी पैसे का दिले नाहीत?’ म्हणत मुलाचा आईवर हल्ला; नात वाचवायला गेली अन् तिलाही मारहाण

Wednesday, 7 October 2026, 18:59
Next Post

WI vs IND 3rd ODI : टीम इंडियाचा वेस्ट इंडिजला व्हाईट वॉश ; विंडीजवर ११९ धावांनी मोठा विजय...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp