Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

व्हायरल व्हिडिओ अन् 500 ची नोट; ‘त्या’ ट्रॅफिक वार्डनची नोकरी जाणार, निलंबनाची प्रक्रिया सुरु…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 13 August 2025, 19:06

पुणे: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर वाहनचालकांकडून हफ्तेखोरी करणाऱ्या ट्रॅफिक वॉर्डनला संतप्त नागरिकांनी रंगेहात पकडून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उर्से टोल नाक्यावर घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून, वॉर्डनच्या कबुलीजबाबाचाही व्हिडिओ लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वॉर्डनने वाहनचालकाकडून वाहतूक पोलिसांच्या सांगण्यावरून 500 रुपये वसूल केल्याची कबुली दिली. संतप्त नागरिकांनी “500 रुपये कोणाच्या आदेशाने वसूल केले?” असा प्रश्न विचारला असता, सुरुवातीला तो केवळ “साहेबांच्या आदेशाने” असे म्हणत होता. मात्र, जमावाचा रोष पाहून त्याने अखेर कर्तव्यावर असलेल्या एका वाहतूक पोलिसाचं नाव घेतलं.

यानंतर नागरिकांनी थेट त्या वाहतूक पोलिसाकडे मोर्चा वळवला. या प्रकरणाचा व्हिडिओ पिंपरी–चिंचवड पोलिसांपर्यंत पोहोचला. वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले असून, प्राथमिक तपासाअंती संबंधित वाहतूक पोलिसाचे निलंबन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच, वॉर्डनला नोकरीवरून काढण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

या घटनेमुळे पोलिस दलाची प्रतिमा पुन्हा एकदा मलीन झाली आहे. विशेष म्हणजे, पिंपरी–चिंचवड परिसरात ट्रॅफिक वॉर्डनकडून हफ्तेखोरी व खंडणी वसुलीची प्रकरणे सर्रास घडतात, अशी स्थानिकांची तक्रार आहे. वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने या वॉर्डनची नेमणूक केली असून, त्यांच्या वेतनासाठी तब्बल 5 कोटी रुपये खर्च केला जातो. तरीसुद्धा, हेच वॉर्डन नागरिकांच्या खिशावर डल्ला मारत असल्याने रोष व्यक्त केला जात आहे.

“या ट्रॅफिक वॉर्डनना खंडणीखोरीचं लायसन्स नेमकं कोणी दिलं? त्यांच्यावर खंडणीचे गुन्हे का दाखल होत नाहीत?” असा सवाल स्थानिकांकडून केला जात आहे. या संदर्भात पालिकेच्या सुरक्षा विभागाचे प्रमुख उदय जरांडे यांनी आपली भूमिका मांडली असून, पुढील कारवाईसाठी तपास सुरू असल्याचे सांगितले.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Headache

Headache : सावधान! वारंवार होणारी डोकेदुखी असू शकते ‘या’ गंभीर आजारांचे लक्षण, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या

Saturday, 4 April 2026, 16:31
The officials who helped Bhondubaba Kharat are now out of luck! Not just transferred, but directly "dismissed"; Direct warning from the Revenue Minister

भोंदूबाबा खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची आता खैर नाही! केवळ बदली नाही, तर थेट “बडतर्फ” करणार; महसूलमंत्र्यांचा थेट इशारा

Saturday, 4 April 2026, 16:21
Pune

Pune : पुणे रेल्वे स्थानकाचा कायापालट! 400 कोटींचे ‘यार्ड रिमॉडलिंग’ आणि 6 नवीन फलाटांची भर; प्रवाशांना मोठा दिलासा

Saturday, 4 April 2026, 16:10
Govt Jobs: Have you passed the 10th standard and are looking for a government job Then start preparing now Big opportunities for Clerk and Typist positions at this place find out about the government's mega recruitment

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! राज्यातील महसूल विभागात 35,876 नवीन पदांची भरती होणार; प्रशासनाकडून मोठी घोषणा

Saturday, 4 April 2026, 15:59

LLB परीक्षेत छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; आमदार राहुल कुल आक्रमक, दोषींवर कारवाईची मागणी

Saturday, 4 April 2026, 15:53

‘नोकरी टिकवून ठेवायची असेल तर माझ्यासोबत संबंध ठेव’ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याला शरीरसुखाची मागणी; लिपिकाच्या निलंबनाचे आदेश

Saturday, 4 April 2026, 15:37
Next Post

शिरूर महसूल विभागाच्या संयुक्त कारवाईमध्ये वाळू माफियांना दणका; घोड धरणातील 6 यांत्रिकी बोटींसह 8 फायबर बोटी स्फोटकांनी उडविल्या...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.