Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: महापालिका शिक्षकाचा घृणास्पद प्रकार: मुलींच्या वॉशरूममध्ये डोकावून पाहायचा अन्…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 24 July 2025, 18:23

पुणे: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एका शाळेतील 13 वर्षीय इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनीवर आणि तिच्या इतर मैत्रिणींवर अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शाळेतील संशयित शिक्षक संतोष हरिभाऊ बेंद्रे (वय 51, रा. कृष्णानगर, चिखली) याला अटक करण्यात आली आहे. ही घटना 11 जुलै ते 19  जुलै 2025 दरम्यान घडली असून, निगडी पोलिस ठाण्यात 23 जुलै रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष बेंद्रे हे महापालिकेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असून, त्यांनी पीडित मुलीसोबत व तिच्या इतर मैत्रिणींशी अश्लील चाळे केले. इतकेच नव्हे, तर शाळेतील वॉशरूममध्ये डोकावून पाहत मुलींच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तनही केल्याचे चौकशीत समोर आले आहे. त्यांच्या या वर्तनामुळे मुली मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाल्या असून, पालकांनी तक्रार केल्यानंतर ही संपूर्ण घटना उघडकीस आली.

या प्रकरणी आरोपी शिक्षकावर भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 74,78,115(2), बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण करणाऱ्या ‘पॉक्सो कायदा 2012’ अंतर्गत कलम 7,8,9(एफ), 12 तसेच अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गंभीर प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन हिरे करत आहेत.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागानेही याची गंभीर दखल घेतली असून, पोलिसांनी सादर केलेल्या एफआयआरच्या आधारे प्रशासकीय कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण मोरे यांनी सांगितले की, “मुख्याध्यापकांकडून यासंदर्भात अहवाल मागवण्यात येणार असून, त्यानंतर संबंधित शिक्षकावर सेवानिलंबनाची कार्यवाही करण्यात येईल.”

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, शाळांमध्ये अशा प्रकारांच्या विरोधात कठोर उपाययोजना करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणे पोलिसांचं “ड्रग्स फ्री” मिशन! आता थेट “मकोका” लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले “वेळीच मार्गावर या, अन्यथा…”

Tuesday, 7 April 2026, 21:37
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15

पाकिस्तानमध्ये आजपासून लॉकडाऊन! 8 वाजताच बाजारपेठांना कुलूप, घरांमध्येही कार्यक्रमांना मनाई; शहबाज सरकारचा कडक निर्णय

Tuesday, 7 April 2026, 19:40

“मला न विचारता लग्नाला का गेली?” बायकोला जाब विचारणं पडलं महागात; पत्नीच्या घरच्यांकडून जावयाला बेदम मारहाण

Tuesday, 7 April 2026, 18:41

पुण्यात चाललंय काय? भरदिवसा चक्क पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न? वाहतूक पोलीसाला गाडीत बसवलं अन् काही अंतरावर नेऊन…

Tuesday, 7 April 2026, 18:35
Next Post

धक्कादायक! 'तुला रोजगार मिळवून देतो' सांगत सासरच्यांनी विधवा सुनेला गुजरातला विकलं; दोन वर्ष शारीरिक अन् मानसिक छळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.