Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत महाराष्ट्रात खाकी वर्दीला कलंक लावणारी एक अत्यंत गंभीर घटना उघडकीस आली आहे. इथं एका तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. हा नराधम दुसरा – तिसरा कोणी नसुन प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक (PSI) आहे. पोलीसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी पोलीस उपनिरीक्षकाने तरुणीला लग्नाचं वचन देतं. तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचारातून पीडित तरुणी गर्भवती राहिल्यानंतर तिचा गर्भपात देखील करण्यात आला. पिडीत तरुणीने या गुन्हाची तक्रार क्रांती चौक पोलीस ठाण्यात दाखल केली. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी PSI ला बेड्या ठोकल्या आहेत. Chhatrapati Sambhajinagar

भागवत ज्ञानोबा मुलगीर असे अटक केलेल्या या अधिकाऱ्याचे नाव आहे. तो इंस्टाग्रामवरून भरती करण्याऱ्या मुलांना प्रेरणा देणाऱ्या रिल बनवतो. अभ्यासासाठी मार्गदर्शन करत असतो. तो सध्या नाशिकमधील पोलीस अकादमीत प्रशिक्षण घेत आहे. आरोपी मुलगीरने पीडित तरुणीला लग्नाचे स्वप्न दाखवतं तिच्यावर अत्याचार केला. अत्याचाराची ही घटना २४ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी क्रांती चौक परिसरातील एका कॅफेमध्ये घडली होती.
आरोपी मुलगीरला अटक
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिच्यावर करण्यात आलेल्या अत्याचारातून तरुणी गर्भवती राहिली, तेव्हा आरोपीने तिच्यावर गर्भपात करण्यासाठी दबाव टाकला आणि तिला तो करायला लावला. या सर्व छळानंतर पीडितेने शनिवारी क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्परता दाखवत लगेचच नाशिकला जाऊन आरोपी मुलगीरला अटक केली.
धमकी देणाऱ्या कुटुंबावरही गुन्हा
या घटनेत आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, पीडितेने आरोपी मुलगीरचे वडील आणि बहिणीला याबाबत सांगितले असता, त्यांनी मदतीऐवजी पीडितेलाच शिवीगाळ केली आणि. एवढेच नाही तर, त्यांनी पीडितेला ‘तुला जे करायचे ते कर, आम्ही कोण आहोत ते तुला माहीत नाही’ जिवे मारण्याची धमकी दिली.
आरोपीला पोलीस कोठडी
आरोपी मुलगीरला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एका जबाबदार अधिकाऱ्याकडूनच असे कृत्य घडल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.







