Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

व्यावसायिकाकडून उकळले सहा लाख रुपये, मुख्य आरोपीसह पाच जणांना बेड्या;आर्थिक घोटाळ्याच्या धमकीने उकळली खंडणी…!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 2 December 2022, 16:37

पुणे : लोकांची आर्थिक फसवणूक करून मोठा आर्थिक घोटाळा केला असून फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्यास व्यवसायाचे नुकसान होईल, अशी भीती दाखवून गुंडाने व्यावसायिकाकडून सहा लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी मुख्य आरोपीसह पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

असीफखान इस्माईलखान पठाण (रा. कोणार्कपुरम, कोंढवा, मूळ रा. औरंगाबाद) असे अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव असून त्याचे साथीदार समीर मेहबूब शेख (वय ३६), शहाबाज मेहमूद खान (५०) आणि फरियाज हसनखान पठाण (३९, तिघे रा. संतोषनगर, कात्रज) तसेच इरफान हसन भोला (२५, रा. पर्वती पायथा) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा व्यवसाय आहे. आरोपी असीफखान पठाण याने व्यावसायिकाला आर्थिक घोटाळ्याची भीती दाखवली. लोकांच्या आर्थिक फसवणुकीबाबत तुमच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्यास व्यवसायाचे नुकसान होईल, अशी भीती दाखवून त्यांना शिवीगाळ केली. तुमच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दिल्यास तुमची प्रतिष्ठा धोक्यात येईल, असे धमकावून त्याने व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी केली.

 

तक्रारदारावर बंदूक उगारून त्याने सहा लाख रुपये उकळले. त्यानंतरही आरोपी पठाण व्यावसायिकाला त्रास देत होता. याबाबत चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पठाण साथीदारांसह फरारी झाला. त्याचा शोध घेण्यासाठी चंदननगर पोलिसांनी पथके नेमली. आरोपी पठाणचा शोध घेताना तो बीड, जालना, औरंगाबाद या शहरांच्या परिसरात रोज जागा बदलून राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

दरम्यान, औरंगाबाद येथे सापळा लावून त्याला अटक करण्यात आली. पठाण याचे साथीदार शेख, खान आणि पठाण यांना; तसेच खंडणीची रक्कम ताब्यात घेतलेल्या भोला याला पर्वती पायथा येथून अटक करण्यात आली. असीफखान पठाण याच्या विरोधात औरंगाबाद आणि पुण्यात खंडणी व चोरीचे चार गुन्हे दाखल आहेत.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे आणि पोलिस निरीक्षक (गुन्हे) जगन्नाथ जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अरविंद कुमरे, अंमलदार संकपाळ नाणेकर, शेखर शिंदे, श्रीकांत कोद्रे, सूरज जाधव, सुभाष आव्हाड, गणेश हांडगर, विकास कदम, नामदेव गडदरे यांनी ही कामगिरी केली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38
Next Post

पाटस-कुसेगाव रस्त्यावर ट्रकने दुचाकीला चिरडले ; आई-वडिलांसह चिमुकल्याचा जागीच मूत्यू...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.