Monday, April 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Malegaon Voting 2026: मालेगावात लोकशाहीची थट्टा! एकाच घरात आढळली 800 हून अधिक बोगस मतदान कार्ड; प्रशासनाची धाड, संपूर्ण शहरात खळबळ

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 15 January 2026, 15:31
Malegaon Voting 2026: A mockery of democracy in Malegaon! More than 800 bogus voting cards found in a single house; Administration raid, excitement in the entire city

मालेगाव: राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी (Malegaon Voting 2026) आज 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया सुरू असतानाच मालेगावमध्ये घडलेल्या एका (Malegaon Mahapalika Election) धक्कादायक घटनेने संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीदरम्यान एका मतदान केंद्राजवळील घरात तब्बल 200 हून अधिक मतदान ओळखपत्रे (Voter ID Cards) सापडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. ही मतदान कार्डे बोगस असण्याचा संशय व्यक्त केला जात असून प्रशासनाने तातडीने कारवाई सुरू केली आहे. (Latest Marathi News)

 

मिळालेल्या माहितीनुसार, ही मतदान कार्डे मतदान केंद्रालगत असलेल्या एका घरात सापडली. स्थानिक नागरिकांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर निवडणूक प्रशासनाला माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिस व निवडणूक अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत कार्डे जप्त केली असून पंचनामा करण्यात आला आहे. या कार्डांचा वापर मतदार फसवणूक किंवा बनावट मतदानासाठी होणार होता का, याचा तपास सुरू आहे. उमेदवारांकडून घटनास्थळीच सविस्तर चौकशी आणि पंचनामा करण्याची मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान, मालेगाव पूर्व भागातील बडी हायस्कूल येथे प्रभाग क्रमांक 15 आणि 17 साठी 30 ते 40 मतदान केंद्र एकाच ठिकाणी असल्याने मतदारांची मोठी धावपळ सुरू आहे. अनेक मतदारांना आपले केंद्र शोधण्यात अडचणी येत असल्याने शहरातील काही तरुणांनी स्वतःहून मतदान केंद्रांचा नकाशा तयार करून नागरिकांना मदत करण्याचा पुढाकार घेतला आहे.

मतदार यादीतील मोठ्या प्रमाणावरील घोळामुळे मतदानाची टक्केवारी घटत असल्याचा आरोप इस्लाम पार्टीचे माजी आमदार आसिफ शेख यांनी केला आहे. त्यांनी याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याचे सांगत नागरिकांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

दुसरीकडे, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावत मतदारांना मतदानासाठी बाहेर पडण्याचे आवाहन केले.

मालेगावमधील ही घटना केवळ एका शहरापुरती मर्यादित नसून, संपूर्ण राज्यातील निवडणूक यंत्रणेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित करणारी आहे. निवडणुकीसारख्या लोकशाहीच्या पवित्र प्रक्रियेत अशा प्रकारच्या घटना घडणे ही गंभीर बाब असून प्रशासनाने याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

The thread of the Kondhwa case has been unraveled..! ATS takes major action in Pune; One arrested

गुन्हा करण्याच्या तयारीत असलेले दोन सराईत गुन्हेगार लोणी काळभोर पोलिसांच्या जाळ्यात

Monday, 13 April 2026, 15:54

मोठी बातमी! राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत 7 मोठे निर्णय; एमपीएससी भरतीपासून ते आरोग्य निधीपर्यंत, काय आहे सरकारचा नवा प्लॅन?

Monday, 13 April 2026, 15:40
Loni Kalbhor

Loni Kalbhor : लोणी काळभोर येथे स्कॉर्पिओने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी, चालकावर गुन्हा दाखल

Monday, 13 April 2026, 15:34
Pune News: What exactly happened in the operation theatre of a renowned doctor in Pune? Patient dies after bypass surgery; case registered.

प्रतीक्षा संपली! मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा निर्णय आता ‘फास्ट ट्रॅक’वर; सरकारने आणली नवी ऑनलाईन सिस्टीम

Monday, 13 April 2026, 14:43

“हे शेत आमचेच आहे, तुम्ही येथे येऊ नका,” थेऊर येथे ऊस पिकाची नासधूस करून मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल

Monday, 13 April 2026, 14:32

आळंदी म्हातोबाची येथील 16 वर्षीय मुलगी बेपत्ता; अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल

Monday, 13 April 2026, 14:04
Next Post

Bhor Accident: भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, चालक फरार; सातारा-पुणे महामार्गावर वेळ येथील घटना  

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.