Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नैसर्गिक प्रसुतीसाठी महिलांनी बर्थ कॅम्पेनियनचा आधार घ्यावा: डॉ.अशोक काळे (नैसर्गिक प्रसुती तज्ञ)

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 12 February 2025, 18:09

पुणे: अखिल भारतीय ग्राहक पंचायत, हवेली तालुका व आरोग्य विभाग पंचायत समिती, हवेली यांच्या संयुक्त विद्यमाने लज्जागौरी मोहीम अंतर्गत कार्यक्रम मंगळवार ११ (फेब्रुवारी) रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, कुंजीरवाडी येथे घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून ग्राहक पंचायतचे संस्थापक सदस्य डॉ. अशोक काळे हे उपस्थित होते. सुलभ नैसर्गिक प्रसुतीसाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत, हवेली तालुका व आरोग्य विभाग पंचायत समिती, हवेली यांच्याकडून हाती घेण्यात आलेल्या लज्जागौरी मोहिमेअंतर्गत हा कार्यक्रम घेण्यात आला होता.

 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. भानुदास सरडे, मध्य महाराष्ट्र प्रांत सदस्य हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कुंजीरवाडी येथील प्रसिद्ध डॉ. अविनाश मराठे हे उपस्थित होते. यावेळी डॉ. अशोक काळे म्हणाले जगातील बहुतेक विकसित देशातील महिलांच्या प्रसुतीच्या काळात सिझेरियनचा हा दर 10 टक्के च्या आसपास असताना भारतात तो 60 टक्के आहे. आपल्या पूर्वजांनी नैसर्गिक प्रसुतीसाठी आडवे न झोपता उभ्याने किंवा पायाच्या चवड्यावर बसून प्रसुती करण्यासाठीचे तंत्रज्ञान आत्मसात केले होते. यालाच लज्जागौरी म्हणून संबोधण्यात येते.

प्रसुतीगृहात मातेला बाळंतपणात होणारा तणाव दूर करण्यासाठी तिच्या जवळच्या महिला नातेवाईक किंवा इतर महिलेस तिच्यासोबत प्रवेश दिल्यास बाळंतपण व प्रसुती पश्चात कालावधीमध्ये मातेचे मानसिक स्वास्थ चांगले राहण्यासाठी मदत होते. यामुळे नवजात अभ्रकाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते, वेदनाशक औषधांची आवश्यकता कमी भासते, बाळंतपणाचा अनुभव सुखद असल्याची जाणीव होते, बर्थ कॅम्पेनियनची निवड करताना प्रसुती मातेची आई, सासू, बहीण, जाऊ, नणंद किंवा कुटुंबातील इतर स्त्री याबरोबर असाव्यात त्यामुळे प्रसुती पश्चात उदासीनतेचे प्रमाण कमी होते. तसेच नैसर्गिक प्रसुतीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचाच आधार घ्यावा जेणेकरून आपलं सिजेरियन टळेल व खर्च देखील कमी होईल असे डॉ. काळे यांनी सांगितले.

पूर्वीचे केर काढणे, जात्यावर दळण दळणे, जिने खाली वर करणे, खाली बसून धुणे भांडी करणे, पाटावरवंटा वाटणे हे आता कालबाह्य झाले आहे. त्यामुळे जीवन शैलीत बदल झाले, परिणामी सिझेरियनचे प्रमाण वाढले. आमच्याकडे नाव नोंदणी केल्यास याबाबत सर्व सुविधा विना खर्च व घरपोच सोडणे देखील मोफत केले जाते. तसेच आम्ही सिझेरियन न करता शक्यतो नैसर्गिक प्रसुतीलाच प्राधान्य देतो. अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र प्रमुख कुंजीरवाडी च्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रूपाली लोखंडे यांनी दिली.

या कार्यक्रमासाठी डॉ. अशोक काळे नैसर्गिक प्रस्तुती तज्ञ, डॉ. अविनाश मराठे, ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांताचे सदस्य भानुदास सरडे, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र कुंजीरवाडी च्या डॉ. रूपाली लोखंडे, डॉ. रूपाली बंगाळे, पुणे महिला आघाडी प्रमुख भाजपा च्या सौ. पूनमताई चौधरी, पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य संदिप शिवरकर, ग्राहक पंचायत तालुका अध्यक्ष कैलास भोरडे, तसेच आरोग्य सेवक, गटप्रवर्तक, आरोग्यसेविका, सेवक वृंद तसेच गरोदर माता भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राघवदास चौधरी यांनी केले, तर आरोग्यसेवक सुनील वाघमारे यांनी आभार मानले .

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Husband secretly hid GPS in wife's sandals; followed her with live location and was shocked as soon as she opened the door...

बायकोच्या सँडलमध्ये नवऱ्याने गुपचूप GPS लपवलं; लाईव्ह लोकेशनने तिच्या मागे गेला अन् दार उघडताच बसला धक्का…

Thursday, 9 April 2026, 21:28
She left her husband for a boyfriend and came to Pune; she killed her unborn child by hitting his head on the wall; she said the reason was heart disease and...

बॉयफ्रेंडसाठी नवऱ्याला सोडून पुण्यात आली; पोटच्या लेकराला तिने भिंतीवर डोकं आपटून संपवलं; हृदयविकाराचं कारण सांगितलं अन्…

Thursday, 9 April 2026, 20:58
Kharat's 40-year-old scandal exposed! He used to change his name to commit fraud; He had tortured a woman in Ahilyanagar, the villagers were shocked and...

खरातचं 40 वर्षांपूर्वीचं कांड समोर! नाव बदलून करायचा भोंदूगिरी; अहिल्यानगरमध्ये केला होता महिलेवर अत्याचार, गावकऱ्यांनी बेक्कार हाणलं अन्…

Thursday, 9 April 2026, 20:29
Crime

Crime : खेळण्या-बागडण्याच्या वयात संसाराचा फास! 14 वर्षीय नवविवाहितेची छळाला कंटाळून आत्महत्या

Thursday, 9 April 2026, 19:53
30 candidates withdraw from Baramati, but elections will still be held; Abhijit Bichukale and Karuna Munde firmly in the fray!

बारामतीत 30 उमेदवारांची माघार, तरीही निवडणूक होणारच; अभिजित बिचुकले अन् करुणा मुंडे मैदानात ठाम!

Thursday, 9 April 2026, 19:49
Ashok kharat

Ashok kharat : धक्कादायक! अशोक खरातने नातेवाईक महिलेलाच जाळ्यात ओढले; 20 व्या वर्षी केला अत्याचार

Thursday, 9 April 2026, 19:36
Next Post
shilpa shinde becomes first police kondgaon

शिल्पा शिंदे बनली भोर तालुक्यातील कोंडगावची पहिली पोलीस

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.