विशाल शिंदे

नसरापूर : भोर तालुक्यातील कासुर्डी गावच्या हद्दीत एका कंपनीच्या मालकीच्या जमिनीवरील बांधकामाची तोडफोड केल्याची घटना समोर आली असून, याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २५ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास कासुर्डी गावच्या हद्दीत संबंधित कंपनीच्या गट क्रमांक १६३ मधील जागेत ही घटना घडली. सदर जागेची सरकारी नियमानुसार मोजणी करून तिच्या हद्दीत सिमेंट व दगडांचे बांधकाम करण्यात आले होते.
तक्रारीनुसार, आरोपीने अनधिकृतपणे या जागेत प्रवेश करत जेसीबीच्या सहाय्याने बांधकाम पाडून मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे संबंधित कंपनीचे आर्थिक नुकसान झाल्याचेही सांगण्यात आले आहे.
या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे. संबंधित व्यक्तीच्या कृत्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास करण्यात येत असून, प्रत्यक्ष पाहणी व साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.






