Monday, April 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ajit Pawar: पिंपरी-चिंचवडमध्ये अजितदादांचा ‘जनता दरबार’; अप्रत्यक्ष प्रचाराचा भाजपला धसका?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 20 September 2025, 15:17
Ajit Pawar: Ajit's 'Janata Darbar' in Pimpri-Chinchwad; BJP hit by indirect campaign?

Photo-Social Media

पिंपरी-चिंचवड : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शनिवारी सकाळी पिंपरी-चिंचवडमध्येही (Pimpri-Chinchwad News) जनता दरबार आयोजित केला. या जनता दरबारात नागरिकांनी थेट अजित पवारांसमोर आपल्या समस्या मांडल्या. मात्र, या दरबारात आलेल्या 79 वर्षीय आजोबांची तक्रार ऐकून उपस्थितांसह राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

 

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासक काळातील कारभाराबाबत सुभाष बोधे नावाचे 79 वर्षीय आजोबा अजित पवारांसमोर तक्रार घेऊन आले होते. त्यांच्या घरासमोर पालिकेने केलेल्या रस्त्याच्या कामामुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

बोधे यांनी अजित पवारांना सांगितले की, आधी त्यांच्या घराला समांतर असा रस्ता होता. मात्र, नव्या कामानंतर रस्ता 5 फूट खाली गेला आणि घर वर राहिले. त्यामुळे गाडी घरासमोर पार्क करणे अशक्य झाले आहे. या समस्येवर उपाय शोधण्याऐवजी पालिकेकडून “गाडी बदला” असा अजब सल्ला दिला गेला. हा किस्सा ऐकून उपस्थित नागरिकांनी अक्षरशः डोक्यावर हात मारला.

या तक्रारीनंतर अजित पवार प्रशासनाला काय आदेश देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पिंपरी-चिंचवड शहरवासीयांना भेडसावणाऱ्या अशा अनेक समस्या सोडवण्यासाठीच हा जनता दरबार आयोजित करण्यात आला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

अजित पवारांनी हा जनता दरबार केवळ लोकशाही पद्धतीने तक्रारी ऐकण्यासाठी घेतलेला नसून संपूर्ण शासकीय यंत्रणेला सोबत घेऊनच ही प्रक्रिया राबवली आहे. आयएएस आणि आयपीएस दर्जाचे अधिकारी थेट मंचावर उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या नोंदवत होते. त्यामुळे तक्रारींचे त्वरित निराकरण व्हावे, असा प्रयत्न या दरबारातून होत असल्याचे दिसत आहे.

मात्र, या जनता दरबारामुळे स्थानिक राजकारणात चर्चांना जोर आला आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचा जनता दरबार म्हणजे अप्रत्यक्ष प्रचार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री या नात्याने अजित पवार जनता दरबार घेत आहेत, मात्र या कार्यक्रमाला केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारीच उपस्थित होते. भाजपचे आमदार किंवा शहराध्यक्ष कार्यक्रमात गैरहजर होते. यावरून भाजपला मुद्दाम वगळले आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या संदर्भात भाजपकडून काही प्रतिक्रिया मिळते का, यासाठी नेत्यांशी संपर्क साधण्यात आला. मात्र, भाजप आमदार महेश लांडगे यांनी नेहमीप्रमाणे फोन उचलणे टाळले. आमदार शंकर जगताप आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी “आम्ही प्रतिक्रिया देणार का, हे नंतर कळवतो” असं सांगितलं. तर आमदार अमित गोरे यांनी “मी सध्या पुण्यात आहे, शहरात आल्यावर प्रतिक्रिया देतो” असं उत्तर दिलं. या सर्व घडामोडींमुळे अजित पवारांच्या भीतीपोटीच भाजपचे स्थानिक नेते बोलण्यास टाळाटाळ करत असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये सुरु झालेला अजित पवारांचा जनता दरबार हा नागरिकांच्या समस्यांचे त्वरित निराकरण करण्याचा उपक्रम आहे की महापालिका निवडणुकीपूर्वीचा राजकीय डावपेच, यावरून राजकीय वर्तुळात मतमतांतरे होत आहेत. मात्र, 79 वर्षीय सुभाष बोधे यांनी मांडलेला किस्सा हा या दरबाराचा मुख्य आकर्षण ठरला असून, प्रशासन आणि नागरिकांमधील तफावत किती गंभीर आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मोठी बातमी! राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत 7 मोठे निर्णय; एमपीएससी भरतीपासून ते आरोग्य निधीपर्यंत, काय आहे सरकारचा नवा प्लॅन?

Monday, 13 April 2026, 15:40
Loni Kalbhor

Loni Kalbhor : लोणी काळभोर येथे स्कॉर्पिओने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी, चालकावर गुन्हा दाखल

Monday, 13 April 2026, 15:34
Pune News: What exactly happened in the operation theatre of a renowned doctor in Pune? Patient dies after bypass surgery; case registered.

प्रतीक्षा संपली! मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा निर्णय आता ‘फास्ट ट्रॅक’वर; सरकारने आणली नवी ऑनलाईन सिस्टीम

Monday, 13 April 2026, 14:43

“हे शेत आमचेच आहे, तुम्ही येथे येऊ नका,” थेऊर येथे ऊस पिकाची नासधूस करून मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल

Monday, 13 April 2026, 14:32

आळंदी म्हातोबाची येथील 16 वर्षीय मुलगी बेपत्ता; अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल

Monday, 13 April 2026, 14:04

पुण्यात भेसळयुक्त मँगो पल्पचा कारखाना; आंब्याचा रस नव्हे फक्त केमिकल

Monday, 13 April 2026, 13:24
Next Post

'हा पैसा तुमच्या बापाचा...'; रोहित पवारांनी अधिकाऱ्याला जागेवरच खडसावलं; नेमकं प्रकरण काय ?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.