Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे पोलिसांची पत्रकारांवर दादागिरी; मोबाईल हिसकावले, व्हिडिओ डिलीट अन् कॅमेरामनला थेट व्हॅनमध्ये डांबले…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 26 January 2024, 22:42

पुणे : पुणे महापालिकेने शिवाजीनगर येथील आशानगर येथे बांधलेल्या पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनाला उपमुख्यमंत्री अजित पवार येणार होते. मात्र, ते येण्यापूर्वीच काँग्रेस पदाधिकारी उद्घाटनस्थळी पोहोचले आणि कार्यक्रम उरकला. या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते व पोलिसांमध्ये झटापट झाली. वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांवर देखील पोलिसांनी दादागिरी केली. त्यामध्ये पत्रकारांच्या कॅमेऱ्याचे नुकसान झाले. पोलिसांनी चक्क काही पत्रकारांचे मोबाईल काढून घेतले. सर्व व्हिडिओ फॉरमॅट केले. तर एका कॅमेरामनला पोलिसांनी ताब्यात घेऊन थेट गाडीमध्ये डांबले. पत्रकारांवरील अन्यायाचा निषेध करत पुणे श्रमिक पत्रकार संघाने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

 

पुणे महापालिकेने सुमारे साडेनऊ कोटी रुपये खर्च करून अशानगर येथे बारा लाख लिटर पाण्याची टाकी बांधलेली आहे. या पाण्याच्या टाकीचे उद्घाटन शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार होते. या कार्यक्रमाचे आयोजन शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केले होते. या टाकीची जागा ताब्यात घेणे भूमिपूजन करणे यासाठी काँग्रेसचे तत्कालीन नगरसेवक दत्ता बहिरट यांनी प्रयत्न केले होते. माझ्या प्रयत्नातून मोफत जागा मिळाली, निधी उपलब्ध करून दिला पण आज याची कदर न करता भाजप या कार्यक्रमाचे श्रेय लाटत आहे, असा आरोप केला होता. त्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी आणि आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजपने काँग्रेसला सन्मानाने कार्यक्रमाला बोलवावे अन्यथा आम्हीच या ठिकाणी उद्घाटन करू, असा इशारा दिला होता.

दरम्यान, पाण्याच्या टाकीचा उद्घाटनाचा समारंभ होण्यापूर्वी काँग्रेसचे मोहन जोशी, आमदार धंगेकर, बहिरट रमेश बागवे यांच्यासह अन्य पदाधिकारी आशा नगर येथे उपस्थित झाले. पोलिसांनी त्यांना रोखले पण धंगेकरांनी आतमध्ये जाऊन नारळ फोडून टाकीचे उद्घाटन केले. यावेळी काँग्रेस व पोलिसांमध्ये झटापट झाली. वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना पोलिसांनी आत जाण्यास मज्जाव केला. त्यांच्यासोबत झटापट केली. या झटापटीत एका वृत्तवाहिनीच्या कॅमेऱ्याचे नुकसान झाले. पत्रकार आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. कॅमेरा बंद पडल्याने मोबाईलमधून या घटनेचे वार्तांकन करत असताना पोलिसांनी वृत्तवाहिनीच्या वार्ताहराचा मोबाईल हिसकावून घेतला. एवढ्यावरच न थांबता चक्क मोबाईल फॉरमॅट मारून सर्व व्हिडिओ डिलीट केले.

या सर्व प्रकारानंतर पत्रकार संतापले. त्याच वेळी पोलिसांनी एका कॅमेरामनला उचलून पोलिसांच्या व्हॅनमध्ये डांबून ठेवले. तर पत्रकाराला उचलून बाजूला काढले यामुळे आक्रमक झालेल्या पत्रकारांनी पोलिसांना जाब विचारला. वरिष्ठ अधिकाऱ्यांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी पोहोचून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. अखेर बिचाऱ्या कॅमेरामनची सुटका करून मोबाईल परत करण्यात आला. पुणे श्रमिक पत्रकार संघाने या घटनेचा निषेध नोंदवला आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Good news for commuters! Missing Link work to be completed by end of April; Only light vehicles will be allowed for the first 3 months

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! एप्रिलअखेर मिसिंग लिंकचे काम संपणार; सुरुवातीचे 3 महिने फक्त हलक्या वाहनांनाच प्रवेश

Wednesday, 8 April 2026, 16:50

सासवड-कोंढवा मार्गावर तणावपूर्ण शांतता! हजारो हिंदू रस्त्यावर; पुण्यात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात

Wednesday, 8 April 2026, 16:21
Crime

Crime : वाढदिवसाचं आमंत्रण हुकलं अन् आयुष्यच संपलं! “मी एकटा पडलो आहे…” स्टेटस ठेवून तरुणाने संपवलं जीवन

Wednesday, 8 April 2026, 16:15
RBI Bank

RBI Bank : बँक ग्राहकांसाठी महत्वाची माहिती; खिशातले पैसे जपून वापरा! RBI ने दिला महागाईचा इशारा, घेतले 5 मोठे निर्णय!

Wednesday, 8 April 2026, 16:04
सरकार शितोळे सेतू, Pune News, Punytil news, punyatil batmya, pune crime, pune today, पुणे बातम्या, पुण्यातील ठळक बातम्या, आजच्या ठळक बातम्या, pune viral News, crime news, pune prime news, पुणे प्राईम न्यूज, pune latest news, pune marathi news, pune marathi batmya, Punyatil news

पुणे-पिंपरी जोडणारा “सरकार शितोळे सेतू” वाहतुकीसाठी खुला! 40 कोटींचा देखणा पूल ठरतोय आकर्षणाचं केंद्र

Wednesday, 8 April 2026, 15:57

युद्ध थांबलं, पण आता पुढे काय? पाकिस्तान-चीनच्या मध्यस्थीवर भारताने दिली पहिली प्रतिक्रिया

Wednesday, 8 April 2026, 15:35
Next Post

आळंदी हादरली! वारकरी शिक्षण देणाऱ्या संस्थाचालकाकडून तीन विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक अत्याचार...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.