Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

 दिलीप वळसे पाटील यांचे नाव आले, तिथं गडी बिथरला’; अजित पवारांची आमदार अशोक पवारांवर जोरदार टीका

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 8 May 2024, 14:22
Ajit Pawar criticized MLA Ashok Pawar and Amol kolhe in loni kalbhor

लोणी काळभोर : शिरूर लोकसभा मतदारसंघातील विकास कामे व्हायला पाहिजे होती, ती मागील खासदारांनी केली नाही. कारण ते केवळ भाषण करणारे कलाकार आहेत. ते नाटकं करतात. त्यामुळे आपल्याला सर्वांगीण विकास करायचा असेल, तर केंद्रात मोदी सरकार निवडून यायला पाहिजे. तुमच्या सर्व समस्या व रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याकरिता शिवाजीराव आढळराव पाटील यांना प्रवित्र मत द्या, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

 

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील पालखीस्थळावर सभेचे आयोजन मंगळवारी (ता.७) करण्यात आले होते. यावेळी बोलताना वरील आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. यावेळी उमेदवार शिवाजी आढळराव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, मंगलदास बांदल आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना पवार म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात ३५ हजार हजार रुपयाची कर्जमाफी २०१४ मध्ये केली, त्यानंतर सत्तेत आम्ही असताना २७ हजार कोटीची शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचे काम करत आहोत. मी स्वतः शेतकरी आहे. मला शेती करायचा नाद आहे, दुसरा कुठला नाद नाही. काँग्रेसने मागासवर्गीय लोकांचा विकास केला नाही, त्यांनी स्वतः बाबसाहेब आंबेडकर असतानाही नेहमीच विरोध केला, संविधान बदलण्याचा खोटी अफवा पसरवली जात आहे. पंडित नेहरू पासून ते आत्तापर्यंत अनेकांनी घटनेतील काही कलमांमध्ये बदल केला आहे. म्हणजे घटना बदलली असे होत नाही.

लोकसभा निवडणूक ही देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीच्या शिखरावर आहे. मोदी यांच्या उज्वल भारत देशाचा एक भाग म्हणून राज्याचा विकास महत्त्वाचा आहे. या हेतूनेच आम्ही भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला आहे. आपण या भागातून एक खासदार दिल्लीत पाठविला तर निश्चित आपल्याला भागातील कामे होण्यास त्याचा उपयोग होणार आहे. सत्ता नसेल तर कामे होणार नाही, त्यामुळे सत्ता महत्त्वाची आहे, असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बोलताना शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, पंधरा वर्षे मी खासदार असताना, ड्रीम प्रकल्प केले होते, पुणे नाशिक हायवे याचा मार्गसुद्धा मीच निर्माण केला होता. त्यासोबत लोणी काळभोर येथील सोळाशे कोटीचा पाणी प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. आता तो अजित पवार यांनी थोडासा टेकू दिल्यास पूर्ण होईल. विरोधी उमेदवाराच्या दिशाभूल भाषणावरती विश्वास ठेवू नका, जो माणूस खिशात असलेले पैसे खर्च करू शकत नाही. तो केंद्रातले पैसे कसे आणू शकेल. त्यामुळे आपल्याला अधिक विकास कामे करण्याकरिता पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवायचे आहे. त्यासाठी घड्याळाच्या चिन्हासमोर बटन दाबून मला निवडून द्यावे.

दिलीप वळसे पाटील यांचे नाव आले, तिथं गडी बिथरला
उरुळी कांचन येथील सभेत अजित पवार म्हणाले, आम्ही ज्यावेळी राजकीय भूमिका घेतली, त्यावेळी आमच्या घरी मी बसलो होतो. डॉ. कोल्हे होते, अशोक पवार होते. सगळ्यांनी आपण हा चांगला निर्णय घेतला पाहिजे म्हटलं. सगळेजण माझ्या सोबत शपथविधीसाठी आले, कोल्हे साहेबांनी प्रतिक्रिया दिली. अशोक पवार मला म्हणत होते, दादा सत्ता असल्याशिवाय काय खरं नाही. असं सतत मला सांगणाऱ्यांपैकी तो एक होता. पण ज्यावेळी पहिली शपथ मी घेतली, दुसरी भुजबळ साहेबांनी घेतली, तिसरी किंवा चौथी शपथ घेण्यासाठी दिलीप वळसे पाटील यांचे नाव आले, तिथं गडी बिथरला, असे म्हणत अजित पवार यांनी अशोक पवार यांच्यावर चांगलीच आगपाखड केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

लोणी स्टेशन चौकात ‘वाहतूक पोलीस पूर्णवेळ उपस्थित असल्याचे कळवा आणि रोख बक्षीस मिळवा’ अशी परिस्थिती; कोंडी सोडवण्यात पोलीस यंत्रणा अपयशी?

Thursday, 9 April 2026, 13:51

“तुम्ही कुणासोबतही…” निवृत्त पोलीस उपायुक्ताने मर्यादा ओलांडली; सोसायटीतील महिलांशी गैरवर्तन, नेमकं काय घडलं?

Thursday, 9 April 2026, 13:35

राजकारण तापले! हर्षवर्धन सपकाळ यांची मोदी सरकारवर जोरदार टीका; ‘न्याय सत्याग्रह’ आंदोलनाने सरकारची झोप उडवणार?

Thursday, 9 April 2026, 12:56

भाजीमध्ये केस सापडला अन् ईश्वरीने गळफास घेतला! नराधम पतीच्या अमानुष छळाला कंटाळून 25 वर्षीय विवाहितेची आत्महत्या

Thursday, 9 April 2026, 12:26
Gram Panchayat Election 2026

Gram Panchayat Election 2026 : संतोष देशमुखांच्या निधनानंतर मस्साजोगमध्ये राजकीय पोकळी! गावाची बिनविरोधची अपेक्षा, पण निवडणुकीत चुरस वाढली; ‘या’ दोन उमेदवारांमध्ये लढत

Thursday, 9 April 2026, 12:16

LLB परीक्षेत शिवरायांचा अवमान करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई, आमदार राहुल कुल यांची मोठी माहिती; CET सेलचा माफीनामा!

Thursday, 9 April 2026, 12:06
Next Post

हॉटेल ओरियंट ग्रॅण्डमध्ये आग; आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.