पुणे: उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज महत्वाची बैठक बोलावली आहे. पुण्यातील 34 गावांच्या वाढीव टॅक्स आणि विविध विषयांवर अजित पवार बैठक घेणार आहेत. दुपारी साडे तीन वाजता सर्किट हाऊस येथे बैठक होणार आहे. पालिकेने घेतलेल्या वाढीव टॅक्स बद्दल गावकऱ्यांनी या आधीही नाराजी व्यक्त केली आहे. आजच्या बैठकीला ३४ गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत.