Politics : अहिल्यानगरमध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. समोरच्या पक्षाच्या उमेदवाराने प्रचार करू नये, यासाठी आमदार संग्राम जगताप यांचे स्वीय सहाय्यक आणि बॉडीगार्ड थेट रिव्हॉल्वर घेऊन उमेदवाराच्या घराबाहेर उभे राहत असल्याचा आरोप शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. यासंदर्भात उमेदवाराची आपबीती सांगणारा एक व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Politics)

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, या आरोपांवर आमदार संग्राम जगताप यांनी मात्र ठाम शब्दांत स्पष्टीकरण देत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
संग्राम जगताप म्हणाले की,
“हा व्हिडीओ शेअर करण्यापूर्वी सुषमा अंधारे यांनी त्याची नीट शहानिशा करायला हवी होती. कोणतीही खात्री न करता चुकीची माहिती पसरवून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.”
याचवेळी त्यांनी सुषमा अंधारे यांच्यावरही टीका करत, हा प्रकार राजकीय हेतूने केल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, सुषमा अंधारे यांनी केलेल्या दाव्यानुसार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे उमेदवार राम माने (काही ठिकाणी राम वाणी असा उल्लेख) यांच्या घराबाहेर आमदार संग्राम जगताप यांचे स्वीय सहाय्यक आणि अंगरक्षक रिव्हॉल्वर घेऊन उभे होते. त्यामुळे उमेदवाराला घराबाहेर पडून प्रचार करता येत नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
सुषमा अंधारे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, “आमदार जगताप स्वतः सोबत नसतानाही त्यांचे लोक समोरच्या पक्षाच्या उमेदवारावर दबाव टाकत आहेत. रिव्हॉल्वर दाखवून दहशत निर्माण केली जात आहे,” असा आरोप करण्यात आला आहे.
प्रचारासाठी घराबाहेर पडण्यास मज्जाव करणाऱ्या आ. संग्राम जगताप यांच्या श्री सहाय्यकाने अंगरक्षकाचा व्हिडिओ निकाल शेअर केला होता.
अहिल्यानगर येथील प्रभाग क्रमांक एक मधून उभे असणारे उमेदवार राम माने यांना रिवाल्वर चा धाक दाखवत संग्राम जगताप यांच्या लोकांनी कशी दहशत निर्माण केली… pic.twitter.com/z5khSyb9nH— SushmaTai Andhare (@andharesushama) January 6, 2026
या संपूर्ण प्रकरणामुळे शहरातील राजकीय वातावरण अधिकच तापलं असून, व्हिडीओची सत्यता काय आणि आरोपांमध्ये तथ्य आहे का, याची चौकशी व्हावी, अशी मागणी आता विविध स्तरांतून केली जात आहे. एकीकडे आरोप-प्रत्यारोप सुरू असताना, हे प्रकरण पुढे काय वळण घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.





