Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

छगन भुजबळांना मोठा दिलासा; ईडीची जामीनविरोधी याचिका फेटाळली

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 22 January 2025, 13:28
Chhagan bhujabl gets ex minister dhannajay munde portfolio Maharashtra

नवी दिल्ली: बहुचर्चित महाराष्ट्र सदन घोटाळ्यासंबंधित हवालाकांड प्रकरणी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा जामीन रद्द करण्याची मागणी करणारी अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

न्या. अभय एस. ओका व न्या. उज्ज्वल भुइया यांच्या खंडपीठाने ईडीच्या याचिकेवर सुनावणी करताना म्हटले की, छगन भुजबळ व समीर भुजबळ यांना जामीन मंजूर करण्याचे आदेश २०१८ साली देण्यात आले होते. त्यामुळे भारतीय संविधानाच्या कलम १३६ नुसार, यात आता हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, म्हणून भुजबळांच्या जामिनाला विरोध करणारी ईडीची याचिका फेटाळण्यात येत आहे, असे खंडपीठाने स्पष्ट केले. हवालाकांड प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने छगन भुजबळ यांना ४ मे २०१८ रोजी जामीन देण्याचा फैसला सुनावला होता. महाराष्ट्र सदन बांधकामात कथितरीत्या घोटाळा करत छगन भुजबळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी पदाचा गैरवापर करत सरकारचे आर्थिक नुकसान झाल्याचे ईडीच्या प्राथमिक चौकशीत समोर आले होते. त्यानंतर ईडीने कारवाई करत भुजबळ यांना अटक केली होती. महाराष्ट्र सदन बांधकाम व विकास कार्य संबंधित कंत्राट एका विशेष कंपनीला देत त्या बदल्यात त्यांनी स्वतःसाठी व स्वतःच्या कुटुंबासाठी लाच स्वीकारल्याचे ईडीचे म्हणणे होते.

दरम्यान, भुजबळ यांनी स्वतःवरील अटकेच्या कारवाईला आव्हान देत दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने धुडकावून लावली आहे. याचिकाकर्ते भुजबळ यांची २०१८ मध्ये जामिनावर सुटका करण्यात आली होती. त्यामुळे सद्यस्थितीत त्यांच्या अटकेच्या अवैधतेवर विचार करणे गरजेचे नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

धक्कादायक! मोराची चिंचोली वॉटरपार्कमध्ये मोठी दुर्घटना; वॉटर राईडवेळी महिलेचा भीषण अपघात, प्रकृती चिंताजनक

Wednesday, 8 April 2026, 17:57

धरणगाव हादरलं! संशयाचं भूत डोक्यात शिरलं अन् पतीने पत्नीवर केले एकामागून एक 13 वार; अंगावर काटा आणणारा थरार!

Wednesday, 8 April 2026, 17:47

बारामतीचा रणसंग्राम! 55 उमेदवार रिंगणात अन् काँग्रेसचं “धनगर कार्ड”; सुनेत्रा पवारांच्या मदतीसाठी फडणवीस मैदानात

Wednesday, 8 April 2026, 17:40

स्मार्ट पुणे, स्मार्ट पोलीस! ‘व्हॉईस टू वर्ड’ तंत्रज्ञानाने FIR होणार सुटसुटीत; काय आहे पुणे पोलिसांची नवी AI सिस्टीम?

Wednesday, 8 April 2026, 17:37

हडपसरमध्ये घरफोडी करून चोरट्यांनी 43 ग्रॅम सोन्याच्या मंगळसूत्रावर डल्ला

Wednesday, 8 April 2026, 17:18

मावळचा कायापालट होणार! हिंजवडी ते नवलाख उंब्रे मेट्रो धावणार? बाळा भेगड्यांची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

Wednesday, 8 April 2026, 17:09
Next Post
MARTI works stopped from last six months

'मार्टी' संस्थेचे कामकाज पाच महिन्यांपासून ठप्प ! प्रशासकीय कामांना गती देण्याची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.