मुंबई: सोशल मीडियावर आपल्या डान्स आणि विनोदी व्हिडिओंनी लाखो चाहत्यांची मने जिंकणारा प्रसिद्ध रीलस्टार प्रथमेश कदम याचे (Reel Star Prathamesh Kadam) 26 जानेवारी रोजीनिधन झाले. तरुण वयात प्रथमेशने जगाचा निरोप घेतल्याने सोशल मीडियावर अफवांचे पीक आले होते. “प्रथमेशने आत्महत्या केली का?” अशा चर्चांना उधाण आले असतानाच, आता त्याच्या आईने समोर येऊन या सर्व चर्चांमागचे सत्य उघड केले आहे.

प्रथमेशची आई प्रज्ञा कदम यांनी सोशल मीडियावर एक भावूक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या म्हणतात की, “प्रथमेशला कोणताही मानसिक त्रास नव्हता किंवा त्याने आत्महत्या केलेली नाही. त्याच्या मृत्यूचे खरे कारण ‘पांढरी कावीळ’ हे आहे.” सुरुवातीला प्रथमेशला रुग्णालयात दाखल केले तेव्हा त्याचे रिपोर्ट्स सामान्य वाटत होते. शेवटच्या क्षणापर्यंत कावीळ असल्याचं कोणाच्याही लक्षात आले नाही. जेव्हा ती त्याच्या संपूर्ण रक्तात पसरली, तेव्हा डॉक्टरांनीही हात टेकले.
पाहा व्हिडीओ:
प्रथमेशची आई प्रज्ञा कदम यांनी व्हिडीओ पोस्ट करत सांगितले कि, “माझ्या मुलाबद्दल चुकीच्या अफवा पसरवू नका,” अशी विनंती त्यांनी हात जोडून केली आहे. एका आईसाठी आपला तरुण मुलगा गमावणे हे दुःख मोठे आहेच, पण लोकांच्या चुकीच्या चर्चांमुळे होणारा मनस्ताप अधिक वेदनादायक असतो.







