मुंबई : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar Plane Crash) यांच्या विमान दुर्घटनेबाबत अद्यापही राज्य विधिमंडळात चर्चा होत नसल्याबद्दल (Ajit Pawar Death) राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अर्धे अधिवेशन संपत आले तरी या गंभीर घटनेवर सभागृहात चर्चा न होणे वेदनादायी आणि चिंताजनक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (Latest Marathi News)

मिटकरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत तसेच माध्यमांशी बोलताना सांगितले की, अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत नेमके काय घडले, हा अपघात होता की घातपात, याबाबत सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. मात्र केवळ चर्चा करण्याची गरज असल्याचे बोलून उपयोग नाही, तर विधिमंडळात ‘पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन’ किंवा अल्पकालीन चर्चेद्वारे हा मुद्दा अधिकृतरीत्या मांडला गेला पाहिजे. अशा चर्चेमुळे हा विषय अधिकृत नोंदीत येईल आणि सत्य समोर येण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
अजित पवार यांच्या निधनानंतरचे हे पहिलेच अधिवेशन असताना या घटनेवर चर्चा होत नसल्याची खंत मिटकरी यांनी व्यक्त केली. “राजकारण खरंच वंगाळ असतं,” असे अजित पवार नेहमी म्हणायचे, त्यांचे ते शब्द आता खरे ठरत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
मिटकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या प्रकरणावर चर्चा करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. माळी कुटुंबीयांना काही व्यक्तींंकडून धमक्या मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला असून त्यांना संरक्षण देण्याची मागणीही करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय व्ही.के. सिंग नावाच्या व्यक्तीला विशेष वागणूक दिली जात असल्याचा आरोप करत त्याच्या भूमिकेवरही संशय व्यक्त करण्यात आला. संबंधित व्यक्तीचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा संशय असल्याचेही मिटकरी यांनी म्हटले. या पार्श्वभूमीवर या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय वातावरण संवेदनशील झाले आहे. त्यांच्या विमान दुर्घटनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असताना विधिमंडळात या विषयावर चर्चा होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






