Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yavat News : यवत येथे श्री महालक्ष्मी माता आषाढ यात्रेची सात काढून सांगता

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Monday, 17 July 2023, 20:17

Yavat News  यवत  : यवत गावचे ग्रामदेवी असलेल्या श्री महालक्ष्मी मातेची आंबील गुगळीची सात काढून आषाढ यात्रेची सांगता करण्यात आली.  (Yavat News) यवत व परिसरातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री महालक्ष्मी मातेच्या गेल्या पंधरा दिवसापासून आषाढ मात्र निमित्त आखाड यात्रा साजरी होत असून, रविवार, मंगळवार, शुक्रवार या दिवशी आपला नवस पूर्ण करण्यासाठी अनेक भाविक या ठिकाणी येऊन आखाड यात्रा साजरी करतात. (Yavat News)

 

आषाढ यात्रेत अनेक भाविक येत असतात. पण यावर्षी पाऊस कमी असल्याने याचा परिणाम यात्रेवर देखील जाणवत होता. अपवाद वगळता अनेक दिवशी यात्रा कमी गर्दीत साजरी करण्यात आली. आषाढ यात्रा असल्याने अनेक भाविकांनी श्री महालक्ष्मी मातेचे दर्शन घेत नवस पूर्ण करण्यासाठी गोड गोड जेवणासह मांसाहारी जेवणाचा पंगती मंदिर परिसरात दिसून येत होत्या.

यावेळी नारळ, ओटी साहित्य, पेढे यांसह अनेक लहान मोठ्या खेळण्याचे व इतर दुकाने थाटली होती. महालक्ष्मी माता नवरात्र उत्सव ट्रस्टच्या वतीने श्री महालक्ष्मी मातेची विविध रूपांमध्ये आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात पूजा करण्यात आली होती.

अमावस्या आज असल्याने सायंकाळी चारच्या सुमारास श्री गणपती मंदिर येथे आरती करून सातेची सुरुवात करण्यात आली. हनुमान मंदिर, शितळादेवी, म्हसोबा चौक रायकर मळा, यवत गावच्या वेशीवरून पुणे सोलापूर रस्त्याने श्री महालक्ष्मी मंदिर येथे श्री महालक्ष्मी मातेस साडी चोळी करत आरती करण्यात आली. यानंतर श्री काळभैरवनाथ मंदिरात जाऊन श्री काळभैरवनाथ व जोगेश्वरी यांना पोशाख करून आरती करून आखाड यात्रेची सांगता करण्यात आली.

यावेळी दरवर्षीप्रमाणे देवीचे पारंपारिक पुजारी अशोक बाबा शेंडगे यांनी आंबील गुगळीचा सडा टाकत धार्मिक कार्य केले. यावेळी देवीचे पोतराज, गोंधळी यांसह ग्रामस्थ, भाविकभक्त व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुणे पोलिसांचं “ड्रग्स फ्री” मिशन! आता थेट “मकोका” लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले “वेळीच मार्गावर या, अन्यथा…”

Tuesday, 7 April 2026, 21:37
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15

पाकिस्तानमध्ये आजपासून लॉकडाऊन! 8 वाजताच बाजारपेठांना कुलूप, घरांमध्येही कार्यक्रमांना मनाई; शहबाज सरकारचा कडक निर्णय

Tuesday, 7 April 2026, 19:40

“मला न विचारता लग्नाला का गेली?” बायकोला जाब विचारणं पडलं महागात; पत्नीच्या घरच्यांकडून जावयाला बेदम मारहाण

Tuesday, 7 April 2026, 18:41

पुण्यात चाललंय काय? भरदिवसा चक्क पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न? वाहतूक पोलीसाला गाडीत बसवलं अन् काही अंतरावर नेऊन…

Tuesday, 7 April 2026, 18:35
Next Post

Yavat News : यवतमध्ये वृद्धाला भरदिवसा लुटले ; दोन तोळे वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या केल्या लंपास

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.