पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) प्रमुख शरद पवार (Sharad Pawar Birthday) हे त्यांच्या राजकारणातील प्रदीर्घ अनुभवासाठी आणि कोणतीही परिस्थिती आल्यास न डगमगणाऱ्या स्वभावासाठी नेहमीच ओळखले जातात. शरद पवार यांचा जन्म डिसेंबर 12, 1940 रोजी झाला होता. आज त्यांचा 85 वा वाढदिवस आहे. बुधवारी रात्री त्यांच्या जनपथ येथील शासकीय निवासस्थानी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. या महत्त्वाच्या कार्यक्रमात राजकारण आणि उद्योग जगतातील अनेक मोठे दिग्गज एकाच मंचावर एकत्र आलेले दिसले असून अनेकांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पाहा, शरद पवार यांचा राजकीय प्रवास, थोडक्यात
राज्याचे आणि देशाचे राजकारण पाहिले तर, शरद पवार यांनी मागील 50 वर्षांहून अधिक काळ देशाच्या राजकारणात अत्यंत सक्रिय योगदान दिले आहे. त्यांच्या दीर्घकालीन राजकीय कारकिर्दीमुळे त्यांचा प्रभाव महाराष्ट्राच्या आणि राष्ट्रीय स्तरावरील कामामुळे दिसून येतो.
शरद पवार यांनी 1967 मध्ये काँग्रेस पक्षातून राजकीय प्रवासाची सुरुवात झाली. काँग्रेसपासून वेगळे होऊन 1999 रोजी त्यांनी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली. वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी आमदार म्हणून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला होता. त्यानंतर वयाच्या 38 व्या वर्षी 1978 मध्ये महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले.
2004 मध्ये शरद पवारांना कॅन्सर असल्याचे निदान झाले होते. उपचार सुरु असतांना ते सकाळी 5 तास मंत्रालयात काम करत असत आणि त्यानंतर ॲपोलो रुग्णालयात जाऊन केमोथेरपी घेत असत.
उपचार सुरु असतांना डॉक्टरने सांगितले कि, आपली सर्व महत्त्वाची कामे पूर्ण करून घ्यावी, कारण त्यांच्याकडे केवळ 6 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. तरीही त्यांनी काम सुरु ठेवले. आणि शरद पवार यांनी महाराष्ट्रातच नव्हे, तर दिल्लीतही अनेक महत्त्वाची पदे यशस्वीरीत्या सांभाळली. ज्यामुळे त्यांची राजकीय वर्तुळात ‘चाणक्य’ म्हणून आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण राजकीय वर्तुळातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी वयाच्या 85 व्या वर्षीही राजकीय क्षेत्रात दाखवलेली सक्रियताही निश्चितच सर्व कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारी आहे. त्यांची ही ऊर्जा आणि कार्यरत राहण्याची जिद्द, तरुण कार्यकर्त्यांसाठी एक आदर्श उदाहरण ठरते.







