Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhor News: हक्काच्या जागेसाठी एकाच कुटुंबात जोरदार राडा, लोखंडी गजाने मारहाण; भोर येथील घटना

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 17 December 2025, 7:53

विशाल शिंदे 

 

भोर: भोर (Bhor News) तालुक्यातील मौजे कांजळे येथे जागेच्या वादातून एकाच कुटुंबातील सदस्यांमध्ये जोरदार वाद होऊन मारहाणीची घटना घडली आहे. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध फिर्यादी दाखल करण्यात आल्या असून, राजगड पोलीस ठाण्यात क्रॉस कंप्लेंट नोंदवण्यात आली आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, 14 डिसेंबर 2025 रोजी दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास घडल्याचे फिर्यादी चंद्रकांत दिनकर गाडे (वय 60, रा. हरपळे वस्ती, फुरसुंगी ता. हवेली) यांनी तक्रारीत नमूद केले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुतण्या विकास पांडुरंग गाडे याच्या घरासमोर तीन खण जागा देण्याच्या मागणीवरून वाद झाला. यावेळी विकास गाडे याने जागा देण्यास नकार देत वाद घातला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून, विकास गाडे याने चंद्रकांत गाडे व त्यांचा मुलगा संतोष यांना हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच विकासची मुलगी कु. पल्लवी हिने विटेने चंद्रकांत गाडे यांच्या उजव्या बरगडीखाली मारल्याचे नमूद करण्यात आले आहे. याचवेळी विकासची पत्नी सौ. सुरेखा व भावजय अरुणा गाडे यांनी फिर्यादीची पत्नी रत्नमाला हिला मारहाण करून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 442/2025 नोंदवण्यात आला आहे.

दरम्यान, याच घटनेबाबत दुसऱ्या बाजूनेही फिर्याद दाखल करण्यात आली आहे. विकास पांडुरंग गाडे (वय 48, रा. कांजळे ता. भोर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरासमोर चुलते चंद्रकांत गाडे, चुलत भाऊ संतोष गाडे, चुलती रत्नमाला गाडे व प्रणव प्रभाकर जाधव हे आले. तीन खण जागा परत घेण्याच्या कारणावरून वाद उफाळून आला. या वेळी चंद्रकांत गाडे यांनी लोखंडी गजाने विकास यांच्या पत्नी सौ. सुरेखा यांच्या डाव्या हातावर मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच संतोष गाडे यांनी लाकडी काठीने विकास यांना मारहाण केली, तर प्रणव जाधव यांनी अरुणा गाडे यांना हाताने मारहाण केल्याचे नमूद करण्यात आले आहे. याशिवाय रत्नमाला गाडे यांनी कु. पल्लवी हिला मारहाण केल्याचा आरोप असून, सर्वांनी शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी गुन्हा क्रमांक 443/2025 दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गंभीर आरोप केले असून, एकाच घरातील नातेवाईकांमध्ये जागेच्या वादातून हा वाद टोकाला गेला आहे. राजगड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली या दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास सुरू आहे. पोलिसांकडून दोन्ही तक्रारींची सखोल चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणण्याचा प्रयत्न केला जात असून, कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

She left her husband for a boyfriend and came to Pune; she killed her unborn child by hitting his head on the wall; she said the reason was heart disease and...

बॉयफ्रेंडसाठी नवऱ्याला सोडून पुण्यात आली; पोटच्या लेकराला तिने भिंतीवर डोकं आपटून संपवलं; हृदयविकाराचं कारण सांगितलं अन्…

Thursday, 9 April 2026, 20:58
Kharat's 40-year-old scandal exposed! He used to change his name to commit fraud; He had tortured a woman in Ahilyanagar, the villagers were shocked and...

खरातचं 40 वर्षांपूर्वीचं कांड समोर! नाव बदलून करायचा भोंदूगिरी; अहिल्यानगरमध्ये केला होता महिलेवर अत्याचार, गावकऱ्यांनी बेक्कार हाणलं अन्…

Thursday, 9 April 2026, 20:29
Crime

Crime : खेळण्या-बागडण्याच्या वयात संसाराचा फास! 14 वर्षीय नवविवाहितेची छळाला कंटाळून आत्महत्या

Thursday, 9 April 2026, 19:53
30 candidates withdraw from Baramati, but elections will still be held; Abhijit Bichukale and Karuna Munde firmly in the fray!

बारामतीत 30 उमेदवारांची माघार, तरीही निवडणूक होणारच; अभिजित बिचुकले अन् करुणा मुंडे मैदानात ठाम!

Thursday, 9 April 2026, 19:49
Ashok kharat

Ashok kharat : धक्कादायक! अशोक खरातने नातेवाईक महिलेलाच जाळ्यात ओढले; 20 व्या वर्षी केला अत्याचार

Thursday, 9 April 2026, 19:36

गुपित माहिती अन् पोलिसांचा सापळा! बारामतीत तांब्याची तार चोरणारे गजाआड; ट्रान्सफॉर्मर ऑईल आणि तांब्याच्या तारा जप्त

Thursday, 9 April 2026, 19:26
Next Post

Pune Weather: पुण्यातील पारा पुन्हा घसरला! थंडीचा कडाका कायम; दुपारी ऊन, रात्री गारठा, पाहा हवामान खात्याचा अंदाज

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.