नवी दिल्ली : भारतात 5G नेटवर्कचे जाळे विस्तारले जात आहे. त्यात Airtel आणि Jio या दोन प्रमुख कंपन्या आपल्या ग्राहकांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यात 5G नेटवर्क पुरवण्याचे काम सध्या केले जात आहे. कारण, यातून ग्राहकांना हाय-स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळू शकेल.
कोणत्याही स्मार्टफोनमध्ये 5G नेटवर्क तेव्हाच काम करते जेव्हा तो फोन 5G असेल. गेल्या एक वर्षात स्मार्टफोन कंपन्यांनी त्यांचे बहुतेक हँडसेट 5G नुसार आणले आहेत. आता लोक 5G स्मार्टफोन खरेदी करण्यासही प्राधान्य देत आहेत. जर तुम्हाला नवीन फोनमध्ये Airtel किंवा Jio चे 5G सिम ॲक्टिव्हेट करायचे असेल तर आम्ही तुम्हाला काही स्टेप्स सांगणार आहोत.
जर तुम्ही नवीन Airtel किंवा Jio 5G सिम खरेदी केले असेल आणि तुमचा फोन देखील 5G असेल, तर सिम घालण्यासाठी सिम इजेक्टर टूलने फोनमधील ट्रे उघडा. या काळात तुमचा फोन बंद ठेवा. ट्रेमध्ये सिम ठेवल्यानंतर ते फोनमध्ये घाला आणि फोन चालू करा. Airtel किंवा Jio 5G सिम अॅक्टिव्ह करण्यासाठी, तुम्हाला एक नंबर डायल करावा लागेल.
121 डायल करून स्टेप्स फॉलो करा…
Airtel 5G सिम अॅक्टिव्ह करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या नंबरवरून 121 वर कॉल करावा लागेल. त्याच वेळी, Jio युजर्संना 1977 नंबर डायल करून टेलि-व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला फॉलो करण्यास सांगितले जाईल त्या स्टेप्स फॉलो करा. शेवटी, तुम्हाला सिम कार्डवर लिहिलेला 20 अंकी सिम क्रमांक टाईप करावा लागेल. काही वेळाने तुम्हाला सिम अॅक्टिव्ह झाल्याचा मेसेज येईल.