नवी दिल्ली : सध्या अनेक नवनवीन स्मार्टफोन्स आणले जात आहेत. त्यात आता प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo नवीन स्मार्टफोन घेऊन येत आहे. यामध्ये 6500 mAh ची दमदार बॅटरी तर असेलच शिवाय 6.72 इंचचा डिस्प्लेही मिळणार आहे. तसेच यामध्ये अनेक बेस्ट असे फीचर्स देण्यात आले आहेत.
Vivo Y300t हा फोन चीनमध्ये iQOO Z10x म्हणून एप्रिलमध्ये लाँच केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. फोनच्या अधिकृत लाँचसह, Y300 Pro+ सोबत त्याची किंमत आणि इतर फीचर्सची माहिती समोर येणार आहे. Vivo ने 31 मार्चला चीनमध्ये Y300 Pro+ स्मार्टफोन लाँच करेल, असे म्हटले होते. आता कंपनीने घोषणा केली आहे की, ती त्याच दिवशी Vivo Y300t देखील लाँच केला जाऊ शकतो. कंपनीने फोनचे स्पेसिफिकेशन्स अजून उघड केले नसले तरी रिपोर्ट्सनुसार, या स्मार्टफोनमध्ये 6.72-इंच FHD+ 120Hz LCD डिस्प्ले, MediaTek Dimensity 7300 SoC, 400% व्हॉल्यूम बूस्ट मोड आणि 44W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट असलेली मोठी 6500mAh बॅटरी दिली जाणार आहे.
तसेच कॅमेराबाबत अधिक माहिती दिली गेली नसली तरी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असेल, ज्यामध्ये 50MP + 2MP लेन्स असू शकतात. हा फोन ब्लॅक, व्हाईट आणि ब्लू कलर ऑप्शनमध्ये लाँच केला जाईल आणि त्यात साईड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर असेल, अशीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे अनेक स्मार्टफोन्सप्रेमींच्या नजरा या फोनकडे लागल्या आहेत.