नवी दिल्ली : सध्या मार्केटमध्ये अनेक स्मार्टफोन उपलब्ध आहेत. पण, फोन खरेदी करण्यापूर्वी आपण त्याचे अनेक फीचर्स तपासूनच त्याला प्राधान्य देतो. असे जरी असले तरी फोन घेतल्यावर आपण पाण्यापासून तो दूर राहील याची काळजी घेतो. मात्र, आता तुम्हाला याची चिंता करण्याची गरज नाही. कारण, आता असा फोन येत आहे जो पाण्यात पडला तरी खराब होणार नाही.
स्मार्टफोनला मिळणारे रेटिंग ते पाण्यात किती सुरक्षित आहे हे ठरवते. पाण्याच्या संरक्षणासाठी IP68 आणि IP69 रेटिंग असलेले स्मार्टफोन सर्वोत्तम मानले जातात. Xiaomi Redmi Note 14 Pro 5G हा बेस्ट असा फोन ठरतो. कारण, या फोनमध्ये IP68 प्रोटेक्शन देण्यात आले आहे. Xiaomi Redmi Note 14 Pro 5G ज्याची किंमत सुमारे 24 हजार रुपये आहे, त्याला IP68 रेटिंग आहे. हा फोन गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लाँच करण्यात आला होता. यात MediaTek चा डायमेंशन 7300 अल्ट्रा चिपसेट आहे.
तसेच या फोनमध्ये 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज आहे. यात 5500 mAh बॅटरी आहे, जी 45 वॅट चार्जिंगला सपोर्ट करते. Xiaomi Redmi Note 14 Pro 5G हा देखील एक चांगला पर्याय आहे. यामध्ये तुम्हाला 6.67 इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला जात आहे. 120 Hz चा रिफ्रेश रेट मिळत आहे. यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपही दिला आहे. मुख्य सेन्सर 50 मेगापिक्सेलचा आहे.