नवी दिल्ली : जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही स्मार्टफोन्सचे पर्याय देणार आहोत. हे स्मार्टफोन्स तुमच्या बजेटमध्येही असणार आहेत. म्हणजे तुम्हाला 15000 रुपयांपेक्षाही कमी किमतीत हे फोन्स उपलब्ध असणार आहेत. यामध्ये Realme च्या P3x 5G स्मार्टफोन समावेश होत आहे.
गेले 6 महिने स्मार्टफोन मार्केटसाठी खूप खास असे राहिले होते. काही स्मार्टफोन ब्रँडच्या विक्रीत वाढ झाली तर काही ब्रँड्सना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागला. त्यात Realme चा P3x 5G हा फोन बेस्ट असा ठरत आहे. या फोनमध्ये 8GB RAM आणि 128GB ROM देण्यात आली आहे. Realme P3x 5G भारतात 14998 च्या किमतीत लाँच करण्यात आला. हा फोन तुम्ही ऑनलाईन देखील खरेदी करू शकता. या फोनमध्ये 6.72 इंचाची LCD स्क्रीन आहे.
तसेच, साइड फिंगरप्रिंट सेन्सरसह इतर अनेक अपडेट्स दिले आहेत. Realme स्मार्टफोन बऱ्याचदा ट्रेंडमध्ये राहतात. कारण, युजर्सचा अनुभव चांगला असल्याचे सिद्ध होते. Realme ने हा फोन भारतीय बाजारपेठेला लक्षात घेऊन लाँच केला होता. तसेच Infinix चा हा नवीन फोन 10347 रुपयांच्या किमतीत खरेदी करता येईल. कॉम्पॅक्ट डिझाइनसह येत असलेल्या या फोनमध्ये 6.7 इंचाची IPS स्क्रीन आहे. हा फोन 48MP मुख्य कॅमेरा सह येतो.
यामध्ये Mediatek Dimensity 6300 Chipset प्रोसेसर देण्यात आला आहे. 5000 mAh बॅटरीमुळे तुम्हाला खूप चांगला बॅकअप मिळणार आहे. तसेच तुमच्यासाठी Tecno Pova 6 Neo 5G हा बेस्ट पर्याय ठरणार आहे. हा फोन 13999 मध्ये खरेदी करू शकता. यात 6.67 इंचाची IPS स्क्रीन आहे. यात 108MP चा प्रायमरी रियर कॅमेरा आहे. Mediatek Dimensity 6300 Chipset मुळे तुम्हाला फोनचा वेगही चांगला मिळतो. 5000 mAh बॅटरीसह तुम्हाला 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल.