नवी दिल्ली : प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung ने S25 सीरीज नुकतीच लाँच केली. तुम्हीही उत्तम फीचर्ससह स्मार्टफोन शोधत असाल, तर तुमच्यासाठी Samsung Galaxy S24 Ultra हा एक बेस्ट असा पर्याय ठरू शकतो. या फोनवर सध्या बंपर डिस्काउंट मिळत आहे. हा फोन 1 लाख 30 हजार रुपयांना लाँच करण्यात आला होता. आता यावर तुम्हाला 30000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे.
Samsung Galaxy S24 Ultra 5G ची किंमत 129999 रुपये असेल. सध्या हा फोन Amazon वर 24 टक्के डिस्काउंटवर उपलब्ध आहे. त्यानंतर हा फोन 99389 रुपयांना तुम्हाला मिळू शकणार आहे. तसेच, एक्सचेंज ऑफर अंतर्गत फोनवर 22800 रुपयांची इतर सूट मिळू शकते. मात्र, ते जुन्या फोनची स्थिती आणि मॉडेलवर देखील अवलंबून असणार आहे. तुम्हाला बँक ऑफर अंतर्गत स्वतंत्र सूट मिळू शकते.
फेडरल बँक क्रेडिट कार्ड क्रेडिट कार्डद्वारे EMI व्यवहार केल्यास तुम्हाला 7.5% ची सूट मिळू शकते. जर तुम्ही 30000 रुपयांपेक्षा जास्त किमतीची खरेदी केली तर फेडरल बँक क्रेडिट कार्डधारकांना दोन हजार रुपयांचा डिस्काउंट मिळू शकणार आहे. Amazon Pay ICICI क्रेडिट कार्ड युजर्सना No Cost EMI ट्रान्झॅक्शनचा पर्याय देखील दिला जात आहे. या कार्डवर No Cost EMI सोबत तुम्हाला 199 रुपये प्रोसेसिंग फी भरावी लागणार आहे. यामध्ये बेस्ट असे फीचर्स देण्यात आले आहेत.