नवी दिल्ली : सध्या विविध कंपन्यांचे स्मार्टफोन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. असे असताना आता प्रसिद्ध कंपनी Realme ने आपला नवा स्मार्टफोन मार्केटमध्ये लाँच केला आहे. हा नवा फोन 14 सीरीजचा असणार आहे. या फोनमध्ये 5860mAh ची शक्तिशाली बॅटरीही देण्यात आली आहे. यासह 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळत आहे.
Realme 14 5G हा फोन पिंक, सिल्व्हर आणि टायटॅनियम कलर ऑप्शनमध्ये आणला जाऊ शकतो. फोनमध्ये स्टोरेजचे वेगवेगळे पर्याय दिले जाऊ शकतात. फोन 8 GB + 256 GB आणि 12 GB + 256 GB स्टोरेज वेरिएंटमध्ये आणला जाऊ शकतो, अशी सध्या माहिती आहे. हा फोन जागतिक बाजारपेठेत लाँच करण्यात आला आहे. भारतात या स्मार्टफोनच्या लाँचिंगच्या तारखेबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. हा फोन यूएईच्या एका वेबसाईटवरही दाखवण्यात आला आहे.
Snapdragon 6 Gen 4 प्रोसेसर आणि 12GB रॅम या फोनमध्ये असेल, असा अंदाज आहे. फोनमध्ये Android 15-आधारित Realme UI 6.0 उपलब्ध असणार आहे. Realme च्या स्मार्टफोनमध्ये 5860mAh बॅटरी मिळणार आहे जी 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येणार आहे. म्हणजेच तुम्हाला अधिक चांगल्या बॅटरी बॅकअपसह जलद चार्जिंग सपोर्ट मिळत आहे.