नवी दिल्ली : सध्याच्या टेक्नॉलॉजीच्या युगात अनेक गोष्टी स्मार्ट होताना दिसत आहेत. त्यात स्मार्टफोनमध्येही बदल होत आहेत. असे असताना आता Realme लवकरच भारतात एक नवीन बजेट स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनीकडून हा फोन Realme C75 या नावाने आणला जाणार आहे.
Realme च्या या फोनच्या लाँचिंगपूर्वी, त्याचे अनेक डिटेल्स ऑनलाईन समोर आले आहेत. Realme च्या या फोनमध्ये MediaTek प्रोसेसर देण्यात आला असून, 6000mAh ची दमदार बॅटरी दिली जाणार आहे. हा फोन Android 15 सह लाँच केला जाईल. Realme C75 मध्ये 120 Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले असेल. सध्या या डिस्प्लेच्या आकाराबाबत माहिती उपलब्ध नाही. तरी, या Realme फोनमध्ये आय कम्फर्ट मोड असण्याची अपेक्षा आहे. बजेट आणि मिड-रेंज स्मार्टफोनमध्ये हे फीचर्स काही नवीन नाही. त्यामुळे आता या फोनमध्येही हे फीचर दिसणार आहे.
आगामी Realme C75 स्मार्टफोनमध्ये MediaTek चा Dimensity 6300 चिपसेट उपलब्ध असेल. हा फोन 4GB आणि 6GB RAM पर्याय आणि 128GB स्टोरेजसह मार्केटमध्ये लाँच केला जाणार आहे. यासोबतच, हा फोन Android 15 वर आधारित Realme च्या कस्टम UI वर काम करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. हा फोन 12000 रुपयांच्या रेंजमध्ये लाँच केला जाईल, अशी माहिती आहे.