नवी दिल्ली : सध्या अनेक नवनवीन गॅजेट्स लाँच केले जात आहेत. स्मार्टफोन, स्मार्टवॉचला प्राधान्य दिलं जात आहे. असे असताना आता Noise ने आपला नवीन Waterproof कॉलिंग स्मार्टवॉच लाँच केला आहे. स्मार्टवॉच सीरीज ColorFit Pro 6 आणि ColorFit Pro 6 Max लाँच केली आहे. यामध्ये अनेक बेस्ट असे फीचर्स देण्यात आले आहेत.
Noise चा हा स्मार्टवॉच अनेक आधुनिक फीचर्ससह मिळत आहे. Gesture Control, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, एकदा फुल चार्ज केल्यावर 7 दिवसांपर्यंत बॅटरी बॅकअप मिळू शकणार आहे. याशिवाय, यात AI फीचर्सही आहे. जो वर्कआउट डेटाचे विश्लेषण करतो आणि उपयुक्त सूचना देतो. ColorFit Pro 6 ची किंमत 5,999 रुपये असून, जर तुम्ही सिलिकॉन, मॅग्नेट किंवा ब्रेडेड बेल्ट निवडला असेल. त्याच वेळी, मेश स्ट्रॅप व्हेरिएंटची किंमत 6,499 रुपये असणार आहे. जी वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध आहे.
तर ColorFit Pro 6 Max च्या लेदर, मॅग्नेटिक आणि सिलिकॉन स्ट्रॅप व्हेरियंटची किंमत 7,499 रुपये असून, तर टायटॅनियम कलर पर्यायासाठी तुम्हाला 7,999 रुपये द्यावे लागतील. या स्मार्टवॉचची विक्री 27 जानेवारीपासून सुरू होणार आहे. ColorFit Pro 6 मध्ये 1.85 इंच AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 390×450 पिक्सेल आहे. हे स्मार्टवॉच IP68 रेटिंगसह येते, जे पाणी आणि धुळीपासून संरक्षण करते.