नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यात आता प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Realme ने आपले Narzo 80 Series चे स्मार्टफोन्स भारतात लाँच केले आहेत. Realme कंपनीने Realme Narzo 80 Pro 5G आणि Realme Narzo 80x 5G हे फोन्स आणले आहेत.
Realme च्या या स्मार्टफोन्समध्ये अनेक बेस्ट असे फीचर्स देण्यात आले आहेत. या फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. यामध्ये मुख्य कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा असून, फोनमध्ये एक मोठा डिस्प्ले दिला गेला आहे. हा फोन एआय फीचर्सने परिपूर्ण असा आहे. Realme Narzo 80 Pro 5G हा फोन IP66, IP68, IP69 रेटिंगला सपोर्ट करतो, ज्यामुळे हा फोन बेस्ट असा ठरत आहे. नवीन Realme फोनची विक्री 15 एप्रिलपासून सुरू होत असली तरी, आज संध्याकाळपासून Early Bird Sale अंतर्गत प्रो-मॉडेल खरेदी करण्याची संधी मिळू शकते.
Realme Narzo 80 Pro 5G आणि Realme Narzo 80x 5G च्या किंमतीबाबत अपडेटही समोर आली आहे. Realme Narzo 80 Pro 5G 8+128 GB मॉडेलची किंमत 19999 रुपये, 8+256 GB मॉडेलची किंमत 21499 रुपये, 12+256 GB मॉडेलची किंमत 23499 रुपये आहे. सर्व मॉडेल्सवर 2000 रुपयांचा कूपन डिस्काउंट दिला जात आहे.