नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यात Vivo चा सब-ब्रँड असलेल्या iQOO ने भारतात दोन नवीन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. iQOO Z10 आणि Z10x असे हे स्मार्टफोन्स आहेत. iQOO Z10 मध्ये 7300mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. ज्यामुळे भारतात इतक्या मोठ्या बॅटरीसह येणारा हा पहिला स्मार्टफोन बनला आहे.
iQOO च्या या दोन्ही स्मार्टफोनमध्ये मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. त्यात 50MP चा Primary Camera सेन्सर उपलब्ध आहे. एका फोनमध्ये स्नॅपड्रॅगन चिपसेट आहे, तर दुसऱ्या फोनमध्ये मीडियाटेक प्रोसेसर आहे. iQOO Z10x हा मध्यम श्रेणीत लाँच करण्यात आला आहे. या फोनची सुरुवातीची किंमत 13499 रुपये ठेवण्यात आली आहे. हे दोन्ही फोन्स 22 एप्रिलपासून खरेदी करता येणार आहे. त्यापूर्वी, iQOO Z10 ची विक्री 16 एप्रिलपासून सुरू होईल.
iQOO Z10 आणि Z10x ची किंमत काय?
iQOO Z10 च्या 8GB+128GB मॉडेलची किंमत 21999 रुपये असणार आहे. त्याच्या 8GB+256GB मॉडेलची किंमत 23999 रुपये आहे. कंपनीने 12GB+256GB मॉडेल देखील आणला आहे, ज्याची किंमत 25999 रुपये आहे. हे स्टेलर ब्लॅक आणि ग्लेशियर सिल्व्हर रंगांमध्ये खरेदी करता येणार आहे.