नवी दिल्ली : सध्या Gmail चा वापर अनेक कामांसाठी केला जात आहे. Gmail ची सेवा गुगलकडून दिली जात आहे. पण, ही सेवा इंटरनेटच्या मदतीने वापरली जाते. युजर्संना ई-मेल पाठवण्याची आणि प्राप्त करण्याची ही सुविधा आहे. अधिकृत कामासाठी ई-मेल आवश्यक असतो.
Gmail हा संभाषणाचा औपचारिक मार्ग बनत आहे. पण, तुम्हाला माहिती आहे का की Gmail चा वापर ऑफलाईन म्हणजेच इंटरनेटशिवाय केला जातो. हे कसे होईल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. काळजी करण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला त्याची माहिती देणार आहोत.
ऑफलाईन मोडमध्ये Gmail कसे वापरावे?
– सर्वप्रथम तुमच्या संगणकावर किंवा लॅपटॉपवर Gmail उघडा.
– यानंतर सेटिंग्ज आयकॉनवर क्लिक करा.
– त्यानंतर See all settings या पर्यायावर क्लिक करा.
– त्यानंतर सामान्य विभागातील ऑफलाईन टॅबवर क्लिक करा.
– येथे तुम्हाला Enable offline mail पर्यायासमोरील बॉक्सवर टीक करावी लागेल.
– त्यानंतर सिंक सेटिंग्ज पर्यायामध्ये, तुम्ही किती दिवसांसाठी मेल सिंक करायचे ते निवडू शकता.
– तुम्ही 7 दिवस, 30 दिवस किंवा 90 दिवस यापैकी निवडू शकता. याने तुम्हाला Offline मेल अॅक्सेस करता येऊ शकतो.