नवी दिल्ली : सध्या अनेक गॅजेट्स लाँच केले जात आहेत. स्मार्टफोन, स्मार्टवॉच आणि सध्यातर इअरबड्स अथवा Airdopes वापरण्याला प्राधान्य दिलं जात आहे. असे असताना Boat चा Airdopes 800 HiDef हा बेस्ट असा इअरबड्स ठरताना दिसत आहे. यामध्ये अनेक बेस्ट असे फीचर्स देण्यात आले असून, किंमतही दोन हजार रुपयांच्या आतमध्ये आहे.
Boat चा Airdopes 800 HiDef हा तुम्हाला 1,899 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. या इअरबड्स हाय-डेफिनिशन ऑडिओ आणि स्टायलिश डिझाइन मिळत आहे. जर आपण त्याच्या चार्जिंग केसबद्दल माहिती घेतली तर ते कॉम्पॅक्ट आयताकृती डिझाइनमध्ये येतो, ज्याच्या कडा गोलाकार अशी डिझाईन केली गेली आहे. चार्जिंग केसच्या समोर एक LED लाईट इंडिकेटर देण्यात आला आहे. जो चार्जिंग दरम्यान चालू होतो आणि बॅटरीचा स्टेटस दर्शविण्यास मदत करतो. यामध्ये USB Type-C चार्जिंग पोर्ट केसच्या उजव्या बाजूला ठेवला आहे, ज्यामुळे चार्ज करणे सोपे होते.
हा इयरबड्स एकूण 40 तासांची बॅटरी लाईफ देतो. इयरबड्सच्या माध्यमातून एका चार्जवर 6 तासांचा बॅकअप मिळत आहे. चार्जिंग केससह एकूण 30 तासांपर्यंतचा बॅकअप सहज उपलब्ध आहे. यामध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळत असून, जो चार्जिंगच्या काही मिनिटांत एक तासाचा प्लेबॅक देतो.