नवी दिल्ली : सध्या Apple कंपनीच्या iPhone 16 Plus या फोनला चांगली पसंती मिळत आहे. या फोनमध्ये तुम्हाला 6.7 इंच डिस्प्लेसह 8GB RAM आणि इतर अनेक बेस्ट असे फीचर्स दिले जात आहेत. iPhone 16 Plus भारतात 89900 रुपयांना लाँच करण्यात आला. या किंमतीत त्याचा 128 GB व्हेरिएंट आणला गेला.
iPhone 16 Plus मध्ये, अॅपलने 6.7 इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले, डायनॅमिक आयलंड, ट्रू टोन आणि 2000 निट्सची पीक ब्राइटनेस दिला आहे. तुम्हाला हा फोन 8GB RAM आणि 128, 256 आणि 512 GB स्टोरेज पर्यायांसह मिळणार आहे. यात 48 MP चा प्रायमरी कॅमेरा असणार आहे. हे OIS सोबत मिळत आहे. याशिवाय, यात 12 MP चा अल्ट्रावाईड कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये Apple AI आणि कॅमेरा बटण आणि अॅक्शन बटण उपलब्ध असणार आहे.
भारतात iPhone 16 Plus 89000 रुपयांना लाँच करण्यात आला होता. या किमतीत त्याचा 128 GB व्हेरिएंट उपलब्ध होता. सध्या या फोनच्या ऑनलाईन खरेदीवर चांगला डिस्काउंट मिळू शकणार आहे. त्यामुळे याची किंमतही कमी होणार आहे. हा फोन तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पर्यायामध्ये उपलब्ध असणार आहे.