नवी दिल्ली : सध्या मार्केटमध्ये अनेक बेस्ट असे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. त्यात प्रसिद्ध कंपनी Lava ने अतिशय कमी किमतीत स्मार्टफोन आणला आहे. या फोनमध्ये 50MP AI कॅमेरा आणि 5000mAh दमदार बॅटरी देण्यात आली आहे. इतकेच नाहीतर हा स्मार्टफोन 7600 पेक्षाही कमी किंमतीत उपलब्ध करून देण्यात आला आहे.
जर तुमचे बजेट कमी असेल तर हा फोन तुमच्यासाठी फायद्याचा ठरणार आहे. Lava च्या या फोनमध्ये 50MP AI कॅमेरा आणि 12GB RAM ही देण्यात आली आहे. Lava O3 Pro असे या फोनचे नाव आहे. हा फोन तुम्हाला ऑनलाईनही घेता येणार आहे. याची सुरुवातीची किंमत 6,999 रुपये दिसत आहे. या स्मार्टफोनमध्ये UniSoC T606 प्रोसेसर बसवण्यात आला आहे. तसेच, Lava O3 Pro मध्ये चांगला ड्युअल रियर कॅमेरा सेटअपही मिळत आहे.
याशिवाय, या स्मार्टफोनमध्ये AI लेन्स फीचरसह 50MP प्रायमरी कॅमेरा असणार आहे. तर सेल्फीसाठी 8MP कॅमेरा देखील आहे. स्मार्टफोन फोनमध्ये 5000mAh ची पॉवरफुल बॅटरी देण्यात आली आहे. तुम्ही हा फोन ऑफलाईन मार्केटमधूनही खरेदी करू शकता.