सातारा: राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजप नेते जयकुमार गोरे यांनी एका महिलेला नग्न फोटो पाठवल्याच्या प्रकरणी आता त्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.आता या प्रकरणातील संबंधित महिलेने मंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधात 17 तारखेपासून उपोषणाला बसणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे आता मंत्री गोरे यांच्या अडचणीत वाढ वाढ होण्याची शक्यता आहे.
यावेळी पीडित महिला म्हणाली, ” मला मागील सहा वर्षांपासून अनेकदा मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांनी त्रास दिला होता. मात्र मी शांतपणे त्रास सहन केला आहे. त्यानंतर मी कलेक्टर ऑफिसला दिवसभर थांबून जिल्हाधिकाऱ्यांना सर्व प्रकार सांगितला, पोलीस अधीक्षकांनाही सांगितले आहे. तरीदेखील माझी कोणीही दखल घेतली नाही. पोलिसांनी या प्रकारणाचा तपास केला नाही. बदनामी होत असल्याने 17 तारखेला उपोषण करणार असल्याचा निर्णय महिलेने घेतला आहे.
महिलेने केला खळबळजनक दावा..
संबंधित महिलेने आणखी एक खळबळजनक दावा केला आहे. पीडित महिला म्हणाली, “मागील दोन दिवसांपासून अजून एक महिला माझ्या संपर्कात आहे. मी तिचं नाव सांगणार नाही. तिची ओळख उघड करणार नाही. परंतु जयकुमार गोरे यांच्याबाबत माझं जे मत आहे, तेच तिचंही मत आहे. ती पुढील दोन दिवसांत मध्यमांसमोर येऊन बोलेल, असा दावा यावेळी संबंधित महिलेने केला आहे.
17 तारखेपासून पीडित महिलेचं उपोषण
याप्रकरणात माझा कोणताही बोलावता धनी नाही, मी एकटीच खंबीर आहे. 17 तारखेला मी उपोषणाला बसणार आहे, यावर मी ठाम आहे. मी केवळ संघर्ष करणार नाही तर दुसरा पर्याय अंमलात आणणार आहे. कुटुंबासह आत्मदहन करणार असल्याचे तिने म्हटले आहे. जयकुमार गोरे यांनी केवळ मलाच नाही तर आणखी एका महिलेला त्रास दिला आहे. ती महिला मध्यमांसमोर येऊन बोलेन असं या महिलेनं म्हटल आहे.
मात्र, मंत्री जयकुमार गोरे यांनी महिलेने केलेले त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांनी आपल्या विरोधात राजकीय कटकारस्थान होत असल्याचे म्हटले आहे.