नाशिक: नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातुन क्रूरतेची परिसीमा गाठणारी घटना समोर आली आहे. येथे पतीने पत्नीच्या चारित्र्यावरील संशयावरून रागाच्या भरात 19 वर्षीय गर्भवती पत्नीचा खून केल्याची घटना घडली आहे. विकी रॉय यादव(20 वर्षे) असं आरोपी पतीचं नाव आहे. तर अमृता कुमारी यादव( 19वर्षे) असे मयत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीस अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पतीने पत्नीचा गळा आवळून खून करत मृतदेह गंगापूर रोडवरील शहीद अरुण चित्ते पुलाजवळील नदीकिनारी फेकून दिला. त्यानंतर आरोपी यादवने पोलिसात पत्नी हरवल्याची माहिती दिली. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्ष्यात घेऊन तपपास केला असता पतीनेच पत्नीचा खून करून मृतदेह फेकून दिल्याचा प्रकार समोर आला.
या प्रकरणी विकी रॉय यादव (वय 20 वर्षे) पतीला अटक केली आहे. त्याने पत्नीच्या चारित्र्याच्या संशय घेत लग्नात सासऱ्यांनी हुंडा न दिल्याने माहेरून पैसे आणावे यासाठी पत्नीचा छळ केला. यानंतर सततच्या भांडणानंतर पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. मृत महिलेचे नाव अमृता कुमारी यादव असे आहे. ती मूळ नेपाळमधील असल्याची माहिती समोर आली आहे.
नाशिक तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून जिल्हा न्यायालयात आरोपी पतीला दाखल केले असल्याची माहिती तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आमले यांनी दिली आहे.