सातारा : सातारा लाच स्वीकारणाऱ्य न्यायाधीश प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. येथे लाच घेताना रंगेहात पकडलेल्या साताऱ्याच्या न्यायाधीशांना मुंबई उच्च न्यायालयाने धक्कादायक निर्णय दिला आहे. न्यायालयाने लाचखोरीचा आरोप असलेल्या न्यायाधीशांना अटकपूर्व जामीन नाकारला आहे. त्यामुळे सातारा सत्र न्यायालयातील न्यायाधीशांना या प्रकरणात दिलासा न मिळाल्याचे समोर आले आहे.
मुंबई हायकोर्टाकडून अटकपूर्व जामीन नामंजूर
अधिक माहिती अशी की, सातारा सत्र न्यायालयातील न्यायाधीश धनंजय निकम यांनी आरोपीला जामीन देण्याकरता 5 लाखांची लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर सातारा सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळल्याच्या निर्णय दिला होता. दिलेल्या निर्णयाविरोधात न्यायाधीश उच्च न्यायालयात गेले मात्र तेथेही त्यांची याचिका आता फेटाळण्यात आली आहे. न्यायाधीशांचे निकटवर्तीय खरात बंधूंमार्फत लाच मागितल्याची एसीबीकडे तक्रार आली होती. त्यानंतर न्यायाधीश निकम यांनी सारे आरोप फेटाळले. मात्र तरीही ‘एसीबी’च्या तपासात निकमांचा यात सहभाग असल्याचे पुरावे मिळाले. हे पुरावे हायकोर्टानं ग्राह्य धरून न्यायाधीशांना मुंबई हायकोर्टाने अटकपूर्व जामीन नामंजूर केली आहे.
एक आरोपी पोलिस अधिकारी..
दरम्यान, न्यायाधीशांना 5 लाखाच्या लाच प्रकरणात मदत करणाऱ्या इतर तीन आरोपींपैकी एक पोलिस अधिकारी असल्याचे समोर आले आहे. आरोपी किशोर खरात हे सहाय्यक पोलिस निरिक्षक असल्याचे तपासात उघड झाले आहे. ते मुंबई पोलीस खात्यात असून वरळी येथे ते कार्यरत आहेत. या प्रकरणात किशोर खरात यांचाही समावेश असल्याचे उघड झाले आहे. न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह चौघांचा जामीन अर्ज सातारा जिल्हा न्यायालयाने या आधीच फेटाळला होता. आता हायकोर्टानेही अटकपूर्व जमीन फेटाळत निकम यांना धक्का दिला आहे.