नागपूर : नागपूर हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी गुप्तचर यंत्रणेच्या मदतीने आरोपींचा शोध घ्यायला सुरूवात केली आहे. या प्रकरणात समाज मध्यमावर भडकवणारे व्हिडिओ टाकणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. हमीद इंजिनिअर आणि मोहम्मद सहजाद खान अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
अधिक माहिती अशी की, हमीद इंजिनिअर मायनॉरीटी डेमोक्रॅटीक पक्षाचा कार्याध्यक्ष आहे. नागपूरातील हिंसाचार प्रकरणात कट रचल्याचा त्याच्यावर आरोप आहे. औरंगजेब समर्थक अशी त्याची ओळख आहे. समाजमाध्यमांवर भडकवणारे व्हिडिओ टाकल्याचा त्याचावर आरोप आहे. हमीद इंजिनिअर ज्या भागात वास्तव्याला आहे त्याच परिसरात ही दंगलीची घटना घडली आहे.
तर मोहम्मद सहजाद खान यालाही अटक करण्यात आली आहे. तो एक युट्यूबर आहे. मोहम्मद सहजाद खान डिजिटल पोर्टल चालवतो. औरंगजेब कबर विरोधातील आंदोलनाविरोधात त्याने व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या दोन आरोपींना आता नागपूर हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आली आहे.