वाशिम : प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्याला देशभरातून भाविक येत आहेत. अशातच परभणीच्या जिंतूर येथील तीन भाविक प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्याला निघाले होते. मात्र, या भाविकांच्या कारचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. वाशिमच्या रिसोड शहराजवळ सेनगाव मार्गावर शनिवारी अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
कुंभमेळ्याला भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. देशासहित राज्यभरातील भाविक या कुंभमेळ्याला जात आहेत. महाराष्ट्रातील सुद्धा अनेक भाविक प्रयागराजकडे निघाले आहेत. याच कुंभमेळ्याला जिंतूरमधून निघालेल्या भाविकांचा रिसोडमध्ये अपघात झाल्याची घटना दुर्दैवी घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परभणीच्या जिंतूरच्या भाविकांच्या कार चालकाचं वाहनावरील ताबा सुटला आणि कार रस्त्याच्या कडेला नाल्यावर जाऊन अडकली. यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, कार नाल्यावर अडकल्याने मोठा अपघात टळला आहे. त्यामुळे या अपघातात कोणालाही इजा झालेली नाही. रिसोड सेनगाव मार्गावर अपघाताची मालिका सुरुच आहे. रिसोड सेनगाव राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या सुरू असून अत्यंत संथगतीने सुरू असलेल्या या रस्त्याच्या कामामुळे दुर्घटनांना आमंत्रण मिळत आहे. असे आरोप केले जात आहेत.