वाशिम : जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. जिल्ह्यात रिक्षा आणि पिकअप यांच्यात झालेल्या अपघात तिघे जण ठार झाले आहेत. तर १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ जवळच्या रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आलं आहे.
घटनेबाबत अधिक माहिती शी की, वाशिमच्या कारंजा तालुक्यामधील कारंजा ते पोहा मार्गावरील तुळजापूर धरणाजवळ रिक्षा आणि भरधाव वेगाने येणारे पिकअप यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाता एवढा थरारक होता की तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर काहींची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना तत्काळ उपचारासाठी कारंजा येथील रुग्णालयात दाखल आलं आहे.
दोन रिक्षा एक पिकअप; तीन वाहनांचा एकत्रीत अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, कारंजा-पोहा मार्गावर भरधाव वेगात येणाऱ्या पिकअपने विरुद्ध दिशेने जाणाऱ्या रिक्षाला धडक दिली. रिक्षा प्रवाशांनी भरलेली होती. धडक एवढी भीषण होती ज्यामुळे रिक्षात बसलेले सर्व प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. यानंतर याच रिक्षाच्या मागून दुसरा मालवाहक रिक्षाची ही धडक पिकअपला बसली आहे. त्यामुळे हा अपघात तीन वाहनांमध्ये झाला आहे. यामुळे तीन मयत झाले आहेत.
अपघाताचे भीषण स्वरूप पाहून स्थानिकांनी लगोलग घटनास्थळाकडे धाव घेतली आणि जखमींना तत्काळ कारंजा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. घटनास्थळी पोलिसांनी जाऊन पंचनामा केला असून अधिकचा तपास कारंजा ग्रामीण पोलीस करत आहेत.