पुणे : भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणने प्रशासकीय अधिकारी पदासह इतर विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. . पात्र आणि इच्छुक उमेदवार FSSAI च्या अधिकृत वेबसाइट fssai.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया १५ एप्रिलपासून म्हणजेच आजपासून सुरू झाली आहे . तर ३० एप्रिल २०२५ पर्यंत अर्ज करता येणार आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३३ पदे भरली जाणार आहेत.
या भरतीमध्ये रिक्त जागांचा तपशील पुढीलप्रमाणे –
संचालक: २ पदे, सहसंचालक: ३ पदे, वरिष्ठ व्यवस्थापक: २ पदे, व्यवस्थापक: ४ पदे, सहाय्यक संचालक: १ पद प्रशासकीय अधिकारी: १० पदे, वरिष्ठ खाजगी सचिव: ४ पदे, असिस्टंट मॅनेजर: १ पद, सहाय्यक: ६ पदे
FSSAIनुसार, ऑनलाईन करण्यात आलेल्या अर्जाची कॉपी, नियोजित फॉर्मेटमध्ये नियोक्ता किंवा कॅडर नियमन प्राधिकरणद्वारे प्रमाणपत्र आणि अन्य सहायक प्रमाण पत्र किंवा कागदपत्रे योग्यप्रकारे सहाय्यक निदेशक, भर्ती प्रकोष्ठ, एफएसएसएआय मुख्यालय, ३१२, तिसरा मजला, एफडीए भवन, कोटला रोड नवी दिल्ली या पत्त्यावर अर्जाची कॉपी पाठवावी लागेल. हे अर्ज १५ मे पर्यंत कार्यालयात पोहचणे आवश्यक आहे.
पात्रता निकष
केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेश किंवा विद्यापीठ किंवा मान्यताप्राप्त संशोधन संस्था किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम किंवा निम-सरकारी, वैधानिक किंवा स्वायत्त संस्थेतील अधिकारी संचालक पदासाठी अर्ज करू शकतात, परंतु ते त्याच पदावर असले पाहिजेत किंवा त्यांना त्याच विभागात किंवा समतुल्य पदाचा पाच वर्षांचा अनुभव असावा.
याशिवाय प्रशासन, वित्त, मानव संसाधन विकास तसेच दक्षता विभागात १५ वर्षांचा अनुभव असलेले लोक देखील यासाठी अर्ज करू शकतात. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १,२३,१०० ते २,१५,९०० रुपये पगार मिळेल.