शिरूर : रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी बाभूळसर खुर्द (ता.शिरूर) येथील परिसरात झाडाखाली सुरु असलेल्या रमी जुगार अड्ड्यावर धाड टाकून सुमारे साडे बारा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच जुगार खेळणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
मंगळवारी(ता.०७)दुपारी ३ वाजता रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी जुगार अड्ड्यावर कारवाई केली .याप्रकरणी विलास सूर्यभान आंबेकर(वय ४२,पोलिस हवालदार रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन)यांनी फिर्याद दाखल केली आहे.
याप्रकरणी बाळू कृष्णाची बत्ते(वय ४२,रा.रांजणगाव गणपती,ता.शिरूर, जि.पुणे),नवनाथ सूर्यकांत थिटे(वय ४३,रा.न्हावरे-खंडागळेवस्ती, ता.शिरूर),संतोष बाजीराव वाळके (वय ४३,रा.करडे,ता.शिरूर),अमोल मारुती गायकवाड (वय ३८,रा.करडे ता.शिरूर,जि.पुणे),नाना विक्रम पवार(रा.भांबर्डे,ता.शिरूर,जि.पुणे), शशी वाळके(रा.बाभूळसर खुर्द,ता. शिरूर,जि.पुणे),गोकुळ गव्हाणे (रा.न्हावरे,ता.शिरूर,जि.पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेबाबत पोलिसांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की,भांबर्डे ते करडे रस्त्यालगत एका शेतात झाडाखाली तेरा पत्त्यांची जुगार(रमी)पैशावर काहीजण खेळत आहेत.त्यानुसार रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ धाड टाकून सात जणांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडून रोख २४ हजार ८०० रुपये,मोबाईल फोन,वाहने आणि इतर जुगाराचे साहित्य असा एकूण १२ लाख ५४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.सदर प्रकरणात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित कारवाई सहायक पोलीस निरीक्षक अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे,पोलीस हवालदार विलास आंबेकर,संतोष आवटी, रामेश्वर आव्हाड,उमेश कुतवळ यांच्या पथकाने केली.पुढील तपास रांजणगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे करीत आहे.
पोलिसांच्या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून,अशा अवैध जुगार अड्ड्यांवर कारवाई अधिक तीव्र करण्यात येईल.असे रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी सांगितले आहे .