Sunday, May 11, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लाडक्या बहिणींना अर्ज करण्यासाठी मुदतवाढ! मुख्यमंत्री म्हणाले, ‘ताई तू काळजी करु नकोस’, व्हिडीओ व्हायरल

Editorby Editor
Thursday, 1 August 2024, 12:21

पुणे : महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस राज्यभरातून भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील महिलांची सेतू कार्यालये आणि तहसील कार्यालयात गर्दी होत आहे. दर महिन्याला 1500 रुपये राज्य शासन देणार आहे. या योजनेसाठी 1 कोटी हून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत.

दरम्यान आता या योजनेसंदर्भात आता आणखी एक अपडेट समोर आली आहे. राज्यभरातील महिलांची वाढती गर्दी आणि प्रतिसाद पाहून सरकारने आता या योजनेचा अर्ज भरण्याची मुदत वाढवली आहे. त्यामुळे आता महिलांना 31 ऑगस्ट 2024 पर्यंत या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by CMO MAHARASHTRA (@cmomaharashtra_)

याबरोबरच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री बोलताना म्हणाले, ‘ ताई, तुमच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली. त्याला तुम्हा सर्वांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय, त्याबद्दल मनापासून धन्यवाद, ताई कुणालाही किती विरोधात बोलू देत, तू काळजी करू नकोस, राज्यातील महायुती सरकार तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभं आहे. तुझ्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आरोग्यासाठी, पोषणासाठी तुला दरमहा दीड हजार रुपये म्हणजेच, वर्षाला 18 हजार रुपये देण्याचा निर्णय तुझ्या या भावानं घेतला आहे.

तसेच, मुख्यमंत्र्यांचा हा व्हिडीओ शेअर करताना एक कॅप्शनही लिहिण्यात आलं आहे. त्यामध्ये लिहिलं आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद. अर्ज भरण्याची मुदत आता 31 ऑगस्ट. अंतिम मुदतीत नोंदणी करणाऱ्यांना देखील मिळणार जुलैपासून लाभ मिळणार. योजनेचा लाभ घेण्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाहन केलं आहे.

लाडकी बहीण योजनेचे अर्ज करण्यासाठी ऑगस्ट अखेरपर्यंत मुदत वाढ करण्यात आली आहे. योजनेसाठी आलेल्या अर्जांची छाननी करुन महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहे. त्यासाठी आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र /जन्म, प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र / पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड, अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक, अर्जदाराचा फोटो लागणार आहे.

राज्य सरकारकडून आता लवकरच लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांच्या नावाची यादी प्रसिद्ध केली जाईल. या यादीत नाव असलेल्या महिलांनाच राज्य सरकार महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत देणार आहे. त्यामुळे आता सर्व महिलांचे डोळे लाडकी बहीण योजनेच्या यादीकडे लागले आहे.

 

Editor

Editor

ताज्या बातम्या

देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांचा साताऱ्यात अपघात ; मिनी ट्रॅव्हल्स आणि ट्रकच्या जोरदार धडकेत तिघांचा मृत्यू तर आठ जखमी

Sunday, 11 May 2025, 12:22

पुण्याला हादरवणारे हत्याकांड, प्रेमसंबंधाला विरोध केल्याने मेहुणीने कट रचून केली भाऊजीची निर्घृण हत्या

Sunday, 11 May 2025, 12:16

शिर्डीत भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाचा मोठा निर्णय ; व्यवसायिकांना बसणार फटका?

Sunday, 11 May 2025, 11:56

पुणे विमानतळावर 20 मिनिटं वीजपुरवठा खंडित, प्रवाशांचा गोंधळ ; नेमकं काय घडलं?

Sunday, 11 May 2025, 11:22

भारत -पाकिस्तान तणावाचा रेल्वे वाहतुकीला फटका; पुण्यातून सीमावर्ती भागाच्या दिशेने जाणाऱ्यांचा मोठा निर्णय…

Sunday, 11 May 2025, 10:36

सरकारकडून ‘संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ’ साठी तब्बल 701 कोटी रुपयांची तरतूद

Sunday, 11 May 2025, 9:57
Next Post
Sujay Vikhe Patil likely to contest assembly election

नगरमध्ये पुन्हा हायहोल्टेज सामना! सुजय विखेंनी विधानसभेसाठी शड्डू ठोकला; संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात विरूद्ध सुजय विखे लढत?

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
[email protected]

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.