जालना: जालन्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे शेतात सरपण आणायला गेलेल्या एका मतिमंद विवाहितेवर 3 नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार भोकरदन तालुक्यात घडला आहे. या प्रकरणी पीडितेच्या पतीने तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. सद्दाम खान अजमेरखान पठाण, सादिकखान शरीफखान पठाण, फारुखखान जिलानीखान पठाण अशी नराधम आरोपींची नावे आहेत.
अत्याचाराचा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड…
याबाबत अधिक माहिती अशी की, जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात एक मतिमंद विवाहित महिला जळणासाठी लाकडे आणण्यासाठी शेतात गेली होती. नराधम आरोपींनी तीच पाठलाग केला. तेथे कोणीही नसल्याचा फायदा घेत आरोपींनी तिच्यावर सामूहिकरीत्या बलात्कार केला. हा प्रकार विवाहितेसोबत असलेल्या साहीलखान पठाण याने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. दोन आरोपी पळून गेले आहेत.
दरम्यान, महिलेच्या पतीने तक्रार दिली आहे. तक्रारीवरून भोकरदन पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांनी घटनास्थळी भेट दिली. तपास अधिकारी राकेश नेटके व त्यांच्या सहकाऱ्यांनी तिन्ही आरोपींना अटक केली. आरोपींना 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.