बीड: भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्या भाईने हरणांची शिकार केल्याचे समोर आले आहे. त्याच्या घरावर वन विभागाने छापा टाकला असता त्याच्या घरातून शिकरीसाठी वापरले जाणारे साहित्य आढळले आहे. अश्यातच आता या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई गँग सक्रिय झाल्याच समोर आलं आहे. याबत खोक्याला एका लॉरेन्स बिश्नोई नावाच्या फेसबुक अकाऊंटवरुन धमकी आलेली आहे.
अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी सतीश भोसले याने एका व्यक्तीला बॅटने मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. खोक्या भाई भाजपचा पदाधिकारी आणि भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचं उघड झालं.
अश्यातच आता हरणांची शिकार केल्यामुळे खोक्याला थेट लॉरेन्स बिश्नोईकडून धमकी असल्याचं बोललं जात आहे. लॉरेन्स बिश्नोई’ नावाच्या फेसबुक खत्यावरून धमकी दिली आहे. त्यात म्हटलं आहे की, “मी त्याला शिक्षा देईल पण तुम्ही देखील (बीड पोलिसांनी) त्याला अटक करा. हरीण, काळवीट आमचं दैवत आहे तो (खोक्या भाई) माफ करण्याच्या लायक नाही त्याला लवकर जेलमध्ये टाका”. या पोस्टमुळे विविध चर्चा होत आहेत. सध्या बीड पोलिस आणि वन विभागाकडून खोक्याच्या कारनाम्यांचा तपास सुरु आहे.