बीड : बीड जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. बीड पोलिसांनी सहा जणांच्या गुन्हेगारी टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. दीपक ऊर्फ सलीम नारायण भोसले, सोमीनाथ ऊर्फ नाज्या दिलीप काळे, मुद्दसर मन्सुर पठाण, सोनी ऊर्फ अनिता गोरख भोसले, शशिकला दीपक भोसले आणि संध्या कोहीनुर भोसले असे आरोपींची नवे आहेत. या टोळीवर आता मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपींनी, आजिनाथ विलास भोसले आणि भरत विलास भोसले या दोघांची 16 जानेवारी रोजी निर्घृण हत्या केली होती. वाहिरा-पिंपळगाव रोडवरील गायरान जमिनीत त्यांनी हत्या केली होती. या प्रकरणी अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील तीन आरोपी अजून तीन जण फरार आहेत. या टोळीवर खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, अवैध शस्त्र बाळगणे, पुरावे नष्ट करणे, रस्ता अडविणे अशा स्वरूपाचे 13 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी घेतला आहे.
दरम्यान, सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश साळवे यांनी याबाबत प्रस्ताव तयार करून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवला. विशेष पोलिस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यानंतर आता या आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे.