जालना: जालन्यातुन एक मोठी अपडेट समोर आली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकर याला जालना प्रशासनाने तडीपार केल्याची माहीती समोर आहे. यामुळे जालन्यात एकच खळबळ उडाली आहे. वाळूचं अवैध उत्खनन, वाळू चोरी, केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे समोर आले आहे.
विलास खेडकर; मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा
अधिक माहिती अशी की, जालन्यातुन एक मोठी अपडेट समोर आली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकर याला जालना प्रशासनाने तडीपार केल्याची माहीती समोर आहे. जालन्यात मनोज जरांगे यांच्या मेहुण्यासह ९ वाळू माफिया आणि मोठ्या गुन्हेगारांवर उपविभागीय न्याय दंडाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा मेहुणा विलास खेडकर याचाही समावेश आहे. त्याच्यासह इतर ९ आरोपींवर वाळूचं अवैध उत्खनन, वाळू चोरी, जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण, जाळपोळ आणि सरकारी कामात अडथळा आणणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
जालना जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी आणि गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे दाखल
दरम्यान, आरोपींवर जालना जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी आणि गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी अंबड उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. वाळू प्रकरणासह इतर गुन्ह्यात आरोपी असलेले ९ आरोपी मारठवड्यातील जालना जिल्ह्यासह बीड , संभाजीनगर, परभणी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. या प्रकरणी आता प्रशासन सक्रिय झाले आहे.