बीड : जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. “तुझ्या भावाने माझ्यावर केस का केली?” असे विचारत डोळ्यात मिरची पावडर टाकून, केस कापण्याच्या कात्रीने जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना बीडमधील लोणगाव येथे घडली आहे. यामध्ये अनिल आत्माराम गायके हा तरूण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर एका खासगी रूग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी दिंद्रुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
अधिक माहिती अशी की, पीडित अनिल आत्माराम गायके हा तरुण गावातील चौकातून घरी चालत जात होता. गावातीलच गोपाळ पांडुरंग राऊत याने पाठीमागून येऊन गायकेला अडवले. सुरुवातीला “तुझ्या भावाने माझ्यावर केस का केली?“ असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर मोबाईल फोडला आणि खिशातील मिरचीची पावडर डोळ्यात टाकून धारदार कात्रीने त्याच्या छातीवर सपासप वार केले.
वार झाल्यानंतर अनिल गायकेने मोठ मोठ्याने आरडाओरडा केला. तेंचा त्याचा भाऊ ज्ञानेश्वर गायके पळत आला. त्यानंतर आरोपीने त्याच्याही मानेवर आरोपीने कात्री द्वारे वार करून पळ काढला. या प्रकरणी अनिल गायके याच्या तक्रारीवरून गोपाळ राऊत याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.