छ्त्रपती संभाजीनगर : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी शरद पवार गटाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर शिर्डीतील अजित पवार गटाच्या अधिवेशनात पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती हाती आली आहे. आमदार सतीश चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
शरद पवार गटाचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. अजित पवार गटाच्या शिर्डीतील अधिवेशना दरम्यान राष्ट्रवादीचं घड्याळ हातात बांधणार असल्याचे बोलले जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या आधीच पक्षाची साथ सोडणार असल्याने शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
सतीश चव्हाण हे विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये होते. त्यानंतर निवडणूक लढवण्यासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचं सरकार आल्यानंतर सतीश चव्हाण यांनी डाव बदलला. सतीश चव्हाण हे उद्या अजित पवार गटाच्या शिर्डी येथे होणाऱ्या अधिवेशनात प्रवेश करणार असल्याची माहीत मिळत आहेत.